प्रायश्चित्त - 4

  • 7.5k
  • 1
  • 3.6k

शाल्मली उठली पहाटेसच आज. आज श्रीश झाला वर्षापूर्वी. आज ती आई झाली होती वर्षभरापूर्वी. जीवनातला परमोच्च आनंद दिला होता श्रीश ने तिला. तिने श्रीशला न्हाऊ माखू घातले. आईकडे गेल्यावर आजी, मामी ने त्याला ओवाळले. बच्चा पार्टीने केक आणूनच ठेवला होता, तो दादाच्या मदतीने श्रीश ने कापला. सगळ्यांनी ‘हैप्पी बर्थ डे टु श्रीश’ म्हटलं. दोन्ही मुलांनी कडेवर घेऊन त्याला नाचवला. श्रीश प्रचंड खूश होता. शाल्मली च्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्या तिने हळूच पुसून घेतल्या. आज ऑफिसच्या पाळणाघरात वाटण्यासाठी शाल्मलीने कप केक्स, चॉकलेटस् घेतली होती. जवळच्या मूकबधीर मुलांच्या शाळेतही संध्याकाळी ती घेऊन जाणार होती श्रीश ला. आता सवय करायलाच हवी होती. ऑफिसमधे