प्रायश्चित्त - 16

  • 6.3k
  • 2.4k

तो मुलांकडे गेला. श्रीशला कडेवर घेतलं. बहुधा त्याच्या कडेवर बसल्यावर श्रीशला खूप उंचावर बसल्यासारखं वाटत असावं. मज्जा वाटत असावी. केतकीला त्याने शाळेबद्दल विचारलं. आंटीला त्रास नको देऊस म्हणाला. नर्स म्हणाली डॉक्टर आलेत बोलावलय तुम्हाला. मग श्रीशला घेऊन निघाली. केतकीला जाताना हाक मारेन म्हणाली. सॅम वाटच पाहत होता त्याच्या केबीन बाहेर तिची. चेहरा लहान मुलासारखा उजळलेला. पटकन तिला आत नेलं. तिथे मी बसलेली. फोटोपेक्षाही कितीतरी सुंदर. नितळ कांत, बोलके डोळे, हसरी जिवणी. एखाद्या चित्रकाराने मन लावून जसं एखादं चित्र परिपूर्ण करावं तशी. तिलाही शाल्मली ऐकून माहित असावी. जुनी ओळख असल्याप्रमाणे मिठी मारली तिने. मागून सॅमला छान आहे अशी खूण केली शाल्मलीने.