प्रायश्चित्त - 18

  • 6.7k
  • 2.9k

सकाळी उठली म्हणण्यात अर्थ नव्हता. झोपलीच कुठे होती? पण बेडवरून उठली. केतकीचा डबा केला. तिला मधेच येऊन उठवून गेली. केतकीने शहाण्या मुलीसारखं पटापट आवरलं सगळं. शाल्मली ला ती गप्प गप्प आहे हे जाणवलं. काल केतनला आपण किती मोठं लेक्चर दिलं नि आता आपणही तसंच वागतोय की. मग तिने केतकीचे केस विंचरून देताना तिला म्हटलं, “केतकी आता कांचनला घरी सोडतील तेव्हा तू पण जाशील घरी. मग आम्हाला खूप आठवण येईल तुझी. तू येशील ना आम्हाला भेटायला?” केतकी काही कळायच्या आत मुसमुसून रडायलाच लागली. बिलगलीच तिला. “आंटी, डॅडला सांगून मला इथेच ठेऊन घेना. मी कसलाच त्रास नाही देणार तुला. मी सगळी मदत