वाचलास रेsssss वाचलास ! - 1

  • 21.2k
  • 2
  • 11.4k

{"वाचलास रेsssss वाचलास !"- ही माझी एक दीर्घ कथा आहे. भयकथा असली तरीही यात सस्पेन्स आणि प्रेम दोन्ही गोष्टी असल्याने वाचक निराश होणार नाहीत. आजपासून दोन दिवस आड यातील नवा भाग प्रकाशित करण्यात येईल. } -------------------------------------------------------------------------------------------------------- 'पॉssssssss.... रात्री १२:४० ची शेवटची लोकल निघून गेली. बाहेर रस्त्यावर २० वर्षे जुनी फटफटी वाट बघत होती. किक मारताच गाडीत भरलेल्या रॉकेलची साक्ष म्हणून, ढीगभर धूर परिसरात सोडून, उरलेल्या ब्रँडीचे दोन घोट पोटात टाकत, मी तशाच भिजलेल्या बेलबॉटम मध्ये बाटली कोंबली आणि तोऱ्यात निघालो... चांगलीच किक बसली होती, फटफटीला पण आणि मला पण.' आठ-दहा पावलांवर कोणी तरुणी पावसात आपली छत्री