लघुकथाए - 1 - प्रेम हे प्रेम असतं : तुझं माझं सेम नसतं

  • 10.5k
  • 1
  • 4.2k

“मॅडम, गरीबाच्या पोटाला द्या की काही, .... ओ मॅडम!” “रवी, फटकाऊन काढीन हां आता. गप्पं बस जरा.” “आयला चिन्मयी, राव, किती गप्पं बसायचं? पूरा तास झाला आपल्याला या झाडाखाली बसून. तू त्या खोडाला टेकून बसलीस कधीची ढगांत नजर लावून, तो ढग आता बरसेल, मग बरसेल डोळ्यातून, आणि मग “झाले मोकळे आकाश” म्हणत मस्त चहा पिऊ म्हटलं तर कसलं काय ...” “रव्या............! तुला खाण्या पिण्या शिवाय दुसरं काही दिसत नाही का रे?” “घ्या आता! त्या कॅंटीन मधे मस्त कटवडा ओरपणार होतो, तेवढ्यात हाताला धरून उठवलंस, दरादरा ओढत या झाडाखाली बसवलंस, मला वाटलं माझ्यासाठी काहीतरी पाठवलंय काकूंनी, मस्त कोथिंबीर वडी किंवा कायतरी,