लघुकथाए - 2 - संगीत

  • 8.9k
  • 3.4k

३ संगीत पंडितजींनी तंबोरा खाली ठेवला. गेले दोन तास त्यांचा रियाज सुरू होता. मनवा त्यांचा रियाज संपण्याची वाटच पहात होती. तंबोरा खाली ठेवल्याच्या आवाजा सरशी ती गरम दुधाचा पेला घेऊन दिवाण खान्यात आली. पेला पंडितजींच्या हातात देऊन तंबोऱ्याला गवसणी घालण्यास तिने सुरवात केली. पहाटेचा रियाज पंडितजी एकटेच करत. दिवस सुरू झाला की शिकायला येणारे विद्यार्थी, काही कार्यक्रम असला की तबलजींबरोबरचे दुपारचे रियाज, सायंकाळ कार्यक्रम ठरवायला येणाऱ्या लोकांसाठी असे. ऐन चाळीशीत पंडित स्वरराज यानी चांगलेच नाव कमावले होते. गावी असताना रियाज भरपूर पण कार्यक्रम कमी असत. मग ते मित्राच्या सांगण्यावरून शहरी आले. इथे आल्या आल्या एका खासगी बैठकीत गाण्याची संधी