लघुकथाए - 3 - चंद्रिका

  • 8k
  • 1
  • 3.3k

ती सकाळी जरा उशीरानेच उठली. दात घासत गॅलरीत आली. सगळी चाळच आळसावलेली. कोणी अजून साखरझोपेत, रात्रीच्या श्रमांनी मोडून आलेली अंग दुमडून रजईत पडलेली. हवा तशी गारच पडली आज. गॅलरीत पत्र्याच्या खालच्या वाशाला टांगलेल्या पत्र्याच्या डब्यातल्या तुळशीला तिने पाणी घातलं आणि चहाचं आधण चढवलं. चहाचा घोट नरड्याखाली गेल्यावर मात्र तरतरी आली तिला. चहा पोटात जाताच निसर्गाच्या हाकेला ओ देत डब्बा घेऊन खाली उतरली. नशीबाने एक दार मोकळं मिळालं . मग वर येऊन आंघोळ करून उठवलं तिने पोराला. “चल रे, उठ, उशीर होईल.” मग फरफऱ्या स्टोव्हला पंप मारून एकीकडे इडलीचा कुकर, वातीच्या स्टोव्हवर चपात्या, भाजी, चटणी, सांबार, बघता बघता झालं सगळं. डबे