लघुकथाए - 6 - न दिली वचने

  • 8.2k
  • 1
  • 3.3k

७ न दिली वचने ”तू तेव्हाही मला आवडायचास जेव्हा माझं असणं तुझ्या गावीही नव्हतं. कित्ती मुली घोळका घालायच्या तुला. कॉलेजचा हीरो होतास तू ! नाटक, गाणं, सगळीकडे तुझंच नाव. अभ्यासातही हुशार. प्रोफेसर्स पण फॅन होते तुझे. मी लांबूनच पहायची तुला. वाटायचं एक नजर तरी टाकावीस माझ्या दिशेने. नुसता लांबून दिसलास ना, तरी एक ठोका चुकायचा माझा. तुला मात्र तेव्हा माझी खबरबातही नव्हती. तू कायम त्या हायफाय मुलींच्या गराड्यात.” “वेडी की खुळी तू? त्या ‘भावल्या’ कधीच नाही भावल्या मला. तू वेगळीच होतीस सगळ्यांपेक्षा. दिसायलाही, आणि वागायलाही. लांबसडक वेणी चालताना अशी काही तालात हलायची की कलेजा खल्लास. एक ठहराव होता तुझ्यात. तुझ्याकडे