वाचलास रेsssss वाचलास ! - 8

  • 11.7k
  • 1
  • 5k

'खड्ड... खड्ड, एक मोठा दगड डिक्कीवर आपटला होता. काहीही फायदा झाला नाही. उलट ती अजूनच घट्ट झाली. बाजूला उभ्या असलेल्या आपल्या गाडीतील स्पॅनर आणि इतर साहित्य काढून त्याने फटफटी सुरु करण्याचा पर्यंत केला. तो ही व्यर्थ होता. फटफटी जागची हलेना. चावी सुद्धा लॉकमध्ये आत फसून बसली होती. त्यामुळे गाडी स्टार्ट होईना आणि डिक्की सुद्धा उघडू शकत नव्हती. एवढे दिवस पावसात भिजल्याने तिची अवस्था वाईट झाली होती. भर पावसात अभिमन्यूला घाम फुटला. आंगातला पांढरा शर्ट चिखल-मातीने लालेलाल झाला होता. गाडी पार उलटी-पालटी करू झाली, तरीही जैसे थे स्थिती होती. रागाने गाडीला एक सणसणीत लाथ घालण्याची इच्छा असूनही ते करता येत नव्हते,