शीर्षक जरा विचित्र वाटतंय ना वाचायला दिन आणि दीन यातला फरक आपल्याला माहितीच आहे दिन म्हणजे दिवस आणि दीन म्हणजे लाचार गरिबी . मी दीन हा शब्द जाणूनबुजून वापरलाय . अगदी तशीच माझी नि माझ्या मित्राची मनाची आणि शरीराची अवस्था झाली होती दीनवाणी . लहानपणी जवळपास ८वी ९ वी च्या सुमारास मी विजय क्लास मधून आल्यावर डिसकव्हरी बघायचो त्यावर एक सुंदर कार्यक्रम लागायचा " आय शुडन्ट बी अलाइव्ह " त्यात माझ्या चांगलाच लक्षात राहिलेला एक प्रसंग होता . तो म्हणजे एक माणूस एका जंगलात हरवला आणि तब्बल २८ दिवसांनी तो कसाबसा मानवी वस्तीत पोचला . त्या काळात त्याच्या कुत्र्याला त्याला