कातरवेळ

  • 15.4k
  • 1
  • 4.5k

'तांबूस तपकिरी सुर्यकिरणे काचेच्या तावदानावरती पसरली होती. झिरपून गेलेल्या जलसरींचे थेंब त्यावर पाझरू लागले. त्याबरोबर आतल्या गडद निळ्या पडद्याची लवलवं सुरू झाली. एखादा चुकार कवडसा आत डोकावू पहात होता. त्याचा एक तिरकस कटाक्ष पडताच तो पडदा स्वतःच्या जागी निश्चल झाला आणि किरणांनी आपली दिशा बदलली. कोणीही आतमध्ये डोकावून पाहणे त्याला मान्य नव्हते, ‌ अगदी वार्यानेही... कारण त्याची ती, ती त्याच्या बाजूला उजव्या कुशीवर पडून शांत निवांत साखर झोपेत होती. हो त्याचीच 'ती' आणि तिचा 'तो'. कालच तर त्यांनी पळून जाऊन लग्न केले. परत तिच्या भोवती आपले तुटके दोन हात गुंफून तो ही निद्रेच्या अधीन झाला. ना कोणाची भीती, ना