दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण दोन)तपन लुल्लाने अंदाज केल्या प्रमाणे दुसरा दिवस स्वच्छ सूर्य प्रकाशाचा होता. पाऊस पूर्ण पणे थांबला होता.आकृती सेनगुप्ता ने तिची गाडी दुरुस्त करायला माणूस आणला होता. त्याने गाडीचा डिस्ट्रिब्यूटर बदलला आणि गाडी व्यवस्थित चालू केली होती. त्या दिवशी आपले काम ती कृत्रिम पणे करत राहिली. तपन हा एक वाया गेलेला मुलगा होता आणि त्याला धडा शिकवायचाच असा तिने निश्चय केला होता.भले तिला तिची नोकरी गमवावी लागली तरी बेहत्तर. तिने त्याच्या विरूध्द दावा ठोकला असता तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता असे तिला वाटून गेले.कारण त्यांनी तिची माहिती गुप्त हेरांकडून मिळवली असती, ती कुठल्या पुरुष बरोबर कधी ,