दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-४)

  • 10.8k
  • 7k

दॅट्स ऑल युअर ऑनर(प्रकरण चार) सायंकाळी बरोब्बर पाच चाळीस ला कनक ओजस ने पाणिनीच्या ऑफिस चा दरवाजा त्याच्या खास शैलीत वाजवला. पाणिनीने सौम्या ला मानेने खून करून त्याला आत बोलवायला सांगितले.‘‘ हाय सौम्या, ‘‘ आत येत असतानाच ओजस म्हणाला. ‘‘पाणिनी तुला लुल्ला प्रकरणात अद्ययावत माहिती हवी आहे? ‘‘‘ अर्थातच. काय आहे विशेष ?‘‘ पाणिनीने विचारले.‘‘पाणिनी या प्रकरणात तुला किती माहिती झाली आहे याची मला कल्पना नाही आणि मला ते माहित करून घ्यायचे पण नाही. ही कंपनी काही विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करते. त्यांची कारखान्याची जागा बंदिस्त आहे ,म्हणजे कोणीही आले आणि आत गेले असे होत नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष पार्किंग आहे.दारावर रखवालदार असतो.येणाऱ्या