दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-५)

  • 10k
  • 5.6k

दॅट्स ऑल युवर ऑनर प्रकरण पाच. पाणिनीने आपल्या जवळच्या किल्लीने ऑफिस चे दार उघडले.आत येताच कॉफीचा मस्त दरवळ आला.‘‘ मला हव्ये एक मस्त कप भरून.आहे ना शिल्लक ? ‘‘पाणिनीने सौम्या ला विचारले.‘‘ आपल्या दोघांसाठीच केली आहे.‘‘ कॉफीचा कप पाणिनीसमोर ठेवत सौम्या म्हणाली. ‘‘ कशी झाली तुमची मैथिली आहुजा बरोबरची भेट ?‘‘‘‘ चांगली झाली आणि नाही पण. पोलीस आकृतीच्या मागावर आहेत.‘‘मैथिलीआहुजा च्या स्कर्ट चा जो तुकडा त्याने कापून आणला होता तो त्याने खिशातून बाहेर काढला.‘‘ काय आहे हे ?‘‘सौम्या ने विचारले.‘‘ मला दोषी धरण्यात येऊ शकेल या सबबीवर मी या तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. ‘‘पाणिनी मिश्कील पणे म्हणाला. ‘‘ बर तुला