दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -६)

  • 9.9k
  • 5.5k

दॅट्स ऑल युअर ऑनर भाग ६दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजताच पाणिनी ऑफिसला आला तेव्हा कनक ओजस आणि सौम्या सोहोनी वर्तमान पत्र वाचताना दिसले.“ फोटो ओळखण्या बाबत काही प्रगती?” पाणिनीने विचारले.“ खास अशी नाही काहीच.” कनकने उत्तर दिले. “ आपला तो वॉचमन रात्रपाळी करतो आणि त्यामुळे सकाळी उशिरा पर्यंत झोपतो.पोलीस त्याला सकाळी लौकरच झोपेतून उठून त्यांच्या बरोबर कुठेतरी घेऊन गेलेत.नेमके कुठे ते समजले नाही.मी माझा एक माणूस तिथे पेरून ठेवलाय.मला कळवेलच तो.त्याला माझा माणूस फोटो सुद्धा दाखवेल आणि प्रश्न विचारेल.दरम्यान तुला सांगायचे म्हणजे तुझे नाव पेपरात आलय, पोलिसांना काही नवीन पुरावा मिळालाय म्हणे.”“ कसे काय ?”“ आपल्या दोघांचा लाडका मित्र