दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-७)

  • 9.6k
  • 5.3k

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण ७पाणिनी पटवर्धन ठीक दहा वाजून पस्तीस मिनिटांनी त्याची गाडी चालू करून पार्किंग लॉट च्या बाहेर पडण्याच्या दारात तयार होता.ती येई पर्यंत वेळ काढायचा म्हणून गाडी चालू करण्यात काहीतरी अडचण आल्याचा बहाणा त्याने केला. दहा चाळीस होऊन पंचवीस सेकंद झाली आणि मैथिली ची गाडी रोरावत आत आली. ती अक्षरशः उडी मारूनच पाणिनीच्या गाडीत बसली. “ एवढे केले तरी जरा उशीर झालाच.” ती दिलगिरी व्यक्त करीत म्हणाली.“ काही हरकत नाही, तू बऱ्यापैकी जमवलस.”“ वेळेबाबत इतका आग्रह का होता ” तिने उत्सुकतेने विचारले.“ मला माझी बाहेर जायची वेळ सहज आणि स्वाभाविक वाटेल आणि ती पार्किग मधल्या रजिस्टर वर