प्रेमगंध... (भाग - २०)

  • 8.9k
  • 4.7k

(आपण मागच्या भागात पाहीलं की, मेघा आणि मीरा या दोघी जुळ्या असतात, त्याचा फायदा घेऊन दोघीही अजय आणि अर्चनाची गंमत करत असतात. त्यामुळे दोघेही खूप गोंधळात पडतात. पण राधिकाला सगळं माहीती पडल्यावर ती त्यांना सगळं सांगते. आणि राधिकाच्या घरच्यांना दोघांचाही स्वभाव, वागणं, बोलणं खूप आवडते. आता राधिकाचे बाबा आणि अजयमध्ये काय बोलणं होतं ते पाहूया....) अजय - "बाबा, तुम्ही आता कसलीच काळजी नका करू. आता यापुढे सगळंच चांगलं होणार आहे. यापुढे कसलंही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आम्हाला दुसरं काही नको फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत कायम असू द्या बस." अजयचं असं आपुलकीचं बोलणं ऐकून राधिकाला