प्रेमगंध... (भाग - २१)

  • 7.8k
  • 4.2k

(आपण मागच्या भागात पाहीलं की, अजय आणि राधिकाच्या बाबांचं व्यवस्थित बोलणं होते. अजय आणि अर्चना दोघेही घरी निघून जातात. मेघा आणि मीराची मजाकमस्ती चालूच असते. सोनाली आणि बाबांच्या बोलण्याने सगळ्यांचे डोळे पाणावतात. घरातलं वातावरण खूपच भावनात्मक होऊन जातं.... आता बघूया पुढील भागात काय होते...) अजयच्या घरी अजयचे आईबाबा, त्याची बहीण अमृता, अर्चनाचा नवरा अजय, अर्चना, तिची आई सर्वच एकत्र जमले होते. अजयने राधिकाच्या बाबांशी झालेलं सगळं बोलणं त्याच्या आईबाबांना सांगितलं. त्यांना पण स्वतःच्या मुलावर खूप गर्व वाटत होता. अजयचे बाबा - "अजय, राधिकाच्या बाबांसोबत अगदी योग्य आणि व्यवस्थित बोललास तू. आम्हाला अगदीच बोलणं पटलं तुझं. आपल्याला घरात राधिकाला आपली