दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -११)

  • 9.1k
  • 4.8k

दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण ११)“ माझा पुढचा साक्षीदार आहे, तुषार संघवी ” दैविक दयाळ ने जाहीर केले. “ तू लुल्ला रोलिंग कंपनीत रखवालदार म्हणून त्यांच्या पार्किंग च्या ठिकाणी आहेस? ” त्याच्या शपथा , ओळख वगैरे झाल्यावर दैविक ने विचारले. “ आणि आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या गाडया तपासण्याचे तुझे काम आहे?” “ आत येणाऱ्या गाड्याच फक्त.पण आम्ही बाहेर जाणाऱ्या गाड्यांवरही लक्ष ठेवतो.” “ या महिन्याच्या पाच तारखेला तू नोकरीत होतास? ” “ होतो.” “ तपन लुल्ला ला तू ओळखत होतास? ” “ वैयक्तिक ओळख नव्हती परंतु मालक या नात्याने तोंड ओळख होती.” “ त्यांची गाडी तुझ्या परिचित होती का? ” “ हो होती. “ पाच तारखेला संध्याकाळी तपन ला त्याच्या