संत एकनाथ महाराज - पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला.

  • 7.5k
  • 3k

श्री संत एकनाथ महाराज” ५ पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला. पैठण मध्ये एक गरीब ब्राम्हण श्री एकनाथ महाराजांचा शिष्य होता.त्याला सर्व प्राणिमात्रात परमेश्वर दिसत असे.रस्त्यात कोणी मनुष्य अथवा प्राणी दिसला की,तो त्यांना साष्टांग दंडवत घालीत असे.लोक त्याला कुचेष्टेने दंडवतस्वामी म्हणत असत.त्याने एकदा मेलेले गाढव जिवंत केले.गाढव जिवंत झाल्यामुळे गावात एकच चर्चेचा विषय झाला.एकनाथांना ही गोष्ट बरी वाटली नाही.म्हणून त्यांनी दंडवत स्वामींना जिवंत समाधी घेण्यास सांगितले.त्यांच्या त्या शिष्याने आसन मांडले आणि डोळे मिटले.क्षणात दंडवत स्वामींचे प्राण पंचत्वात विलीन झाले. दंडवत स्वामींच्या प्राण त्यागाची घटना सर्व गावभर पसरली.कुटाळ लोकांना व नाथांच्या निंदकांना ही एक चांगली संधी चालून आली.त्यांनी नाथांवर ब्रम्हहत्येचे पातक फोडले.त्यांनी