संत एकनाथ महाराज ८ भक्ती महात्म्य

  • 5.9k
  • 2.3k

संत एकनाथ महाराज ८ भगद्भक्ती श्लोक ४१ वा देवर्षिभूताप्तनृणां पितृणां, न किंकरो नायमृणी च राजन् । सर्वात्मना यः शरणं शरण्यं, गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तुम् ॥४१॥ शरणागता निजशरण्य । मुकुंदाचे श्रीचरण । सद्भावें रिघाल्या शरण । जन्ममरण बाधीना ॥४६०॥ जेथ बाधीना जन्ममरण । तेथें देव-ऋषि-आचार्य-पितृगण । यांच्या ऋणांचा पाड कोण । ते झाले उत्तीर्ण भगवद्भजनें ॥६१॥ जो विनटला हरिचरणीं । तो कोणाचा नव्हे ऋणी । जेवीं परिसाचिये मिळणीं । लोह काळेपणीं निर्मुक्त ॥६२॥ सकळ पापांपासूनी । सुटिजे जेवीं गंगास्नानीं । तेवीं विनटल्या हरिचरणीं । निर्मुक्त त्रैऋणीं भगवद्भक्त ॥६३॥ भावें करितां भगवद्भक्ती । सकळ पितर उद्धरती । ऋषीश्र्वरां नित्य तृप्ती । भगवद्भक्ति-स्वानंदें