संत एकनाथ महाराज - ११ श्रीकृष्ण दर्शन

  • 6.7k
  • 2.3k

श्री संत एकनाथ महाराज ११ श्रीकृष्ण दर्शन श्लोक १ ला श्रीशुक उवाच । अथ ब्रह्मात्मजैः देवैः प्रजेशैरावृतोऽभ्यगात् । भवश्च भूतभव्येशो ययौ भूतगणैर्वृतः ॥१॥ शुक म्हणे परीक्षिती । पहावया श्रीकृष्णमूर्ती । सुरवर द्वारकेसी येती । विचित्र स्तुति तिंहीं केली ॥२४॥ श्रीकृष्णमूर्तीचें कवतिक । पहावया देव सकळिक । चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातले ॥२५॥ करावयास प्रजाउत्पत्ती । पूर्वीं नेमिला प्रजापती । तोही आला द्वारकेप्रती । कृष्णमूर्ती पहावया ॥२६॥ सनकादिक आत्माराम । अवाप्तसकळकाम । तेही होऊनि आले सकाम । मेघश्याम पहावया ॥२७॥ भूतनायक रुद्रगण । आले अकराही जण । पहावया श्रीकृष्ण । भूतगणसमवेत ॥२८॥ पहावया श्रीकृष्णरावो । घेऊनि गणांचा समुदावो । द्वारके