संत एकनाथ महाराज--१३ श्रीकृष्ण उद्धव संवाद

  • 5.9k
  • 2.2k

श्रीसंतएानाथमहाराज१३श्रीकृष्ण संवाद श्लोक १० वा स्यान्नस्तवाङ्‌घ्रिरशुभाशयधूमकेतुः । क्षेमाय यो मुनिभिरार्द्रहृदोह्यमानः । यः सात्वतैः समविभूतय आत्मवद्भिःभ । व्यूहेऽर्चितः सवनशः स्वरतिक्रमाय ॥१०॥ आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतु । तुझाचि जी विख्यातु । त्रैलोक्यांतु श्रीकृष्णा ॥११॥ पापइंिधनाचा मेळु । तेथ तुझा चरण वडवानळु । लागतां तो अतितेजाळु । तिळेंतिळु जाळितु ॥१२॥ ऐसा पापियांतें कांपविता । प्रेमळांतें अभयदाता । तुझा चरण जी अनंता । हृदयीं सर्वथा वाहताति ॥१३॥ तेंचि हृदय जी कैसें । वोळलें भक्तिप्रेमरसें । तेथ तुझे चरण सावकाशें । अतिउल्हासें वाहताति ॥१४॥ करितां चरणाचें ध्यान । जे विसरले भूकतहान । त्यांसी द्यावया अभयदान । चरणध्वजु जाण पैं तुझा ॥१५॥