ॲ लि बी. (प्रकरण ६)

  • 7k
  • 1
  • 3.8k

ॲलिबी भाग ६प्रकरण ६पाणिनी पटवर्धन ऑफिस मधे आला तेव्हा ओजस दारातच त्याची वाट बघत होता. काहीतरी महत्वाचे असणार हे ओळखून पाणिनी ने हाताला धरून त्याला आत घेऊन मानेनेच काय ते पटकन सांग असे सुचवले.“ पळशीकर गायब आहे, ना पोलीस त्याला शोधू शकले, ना मी. हॉस्पिटल च्या व्यवहारात टोपे बरोबर त्याच्याही चेक वर सह्या होत्या त्यामुळे त्यांना तो हवाय.” – ओजस“ त्याच्या मैत्रिणी बद्दल काय कळले का?” -पाणिनी“ काहीच नाही.”“ बर, तुला अजून एक काम देतो.माझ्या पेपरातल्या जाहिरातीला उत्तर देण्यासाठी कोणीतरी पेपर च्या ऑफिस ला येईल. तिथे एक तुझा हेर पेरून ठेव.आणि जो येईल त्याचा पाठलाग करायला त्याला सांग.”आणखी एक काम.