स्वप्नांचे इशारे - 6

  • 7.1k
  • 3.5k

  सर केबिन मधे गेल्यावर प्रियाला बोलवता. थँक्यू प्रिया,.,. प्रिया आश्चर्याने सरांनकडे बघते. सर तिचे भाव ओळखतात आणि सांगतात मला तुमच्या जवळ लंच साठी बोलवण्यासाठी .तु विचार करण्याआधी की मला कस कळलं मीच सांगतो, माझा हातरुमाल कॅटींग मधे खुर्ची वर राहून गेला होता तोच घ्यायला परत आलो तेव्हा तुझ आणि केतकी च बोलण ऐकलं.प्रिया समजते .थँक्यू प्रिया माझी इतकी काळजी करण्यासाठी.प्रिया ऐकून एकदम स्तब्ध होते तिला सुचत नाही काय बोलावं .ती तिच्या ही नकळत सरांची काळजी करत असल्याचं तीला जाणवते. तेवढ्यात केतकी येते , मे आय कम इन सर? येस कम. सर तुम्ही मीटिंग साठी सांगितलं होत सगळे जमलेत.ओके आलोच