स्वप्नांचे इशारे - 6 ️V Chaudhari द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नांचे इशारे - 6

 

सर केबिन मधे गेल्यावर प्रियाला बोलवता. थँक्यू प्रिया,.,. प्रिया आश्चर्याने सरांनकडे बघते. सर तिचे भाव ओळखतात आणि सांगतात मला तुमच्या जवळ लंच साठी बोलवण्यासाठी .तु विचार करण्याआधी की मला कस कळलं मीच सांगतो, माझा हातरुमाल कॅटींग मधे खुर्ची वर राहून गेला होता तोच घ्यायला परत आलो तेव्हा तुझ आणि केतकी च बोलण ऐकलं.प्रिया समजते .थँक्यू प्रिया माझी इतकी काळजी करण्यासाठी.प्रिया ऐकून एकदम स्तब्ध होते तिला सुचत नाही काय बोलावं .ती तिच्या ही नकळत सरांची काळजी करत असल्याचं तीला जाणवते. तेवढ्यात केतकी येते , मे आय कम इन सर? येस कम. सर तुम्ही मीटिंग साठी सांगितलं होत सगळे जमलेत.ओके आलोच तुम्ही व्हा पुढे. केतकी आणि प्रिया जातात. सगळे त्यांचीच वाट बघत असतात .सर ही मागोमाग येतात.हे सगळ्याचे कालच्या कामाचे रिपोर्ट....कार्तिक काही फाईल सरांसमोर ठेवतो. सर सगळ्याच्या फाईल चेक करतात. सगळे चेक करून झाल्यावर ते पुढच्या कामाबद्दल समजवतात. समजवत असताना त्यांना प्रिया त्यांच्या पासून नजर चोरत असल्याचं जाणवत.ते प्रिया सोबत नंतर या विषयावर बोलायचं ठरवतात.समजवून झाल्या नंतर ते केबिन कडे जायला निघतात, सगळे आपापल्या डेस्क वर जातात.तेवढ्यात कार्तिक सरांना कामाबद्दल काही विचारण्या साठी थांबवतो.इकडे केतकी प्रिया च बोलण सुरू असत.काय प्रिया मग उद्या वाढदिवसाचं काय स्पेशल सुट्टी ही आहे मस्त? काही नाही यार बघू सांगून प्रिया कामाला लागते.सर ते ऐकतात.केबिन मधे येतात , आपण प्रियाला विश करायला हवं असं त्यांना वाटतं पण ऑफिस ला सुट्टी राहील उद्या तर अस विचार करून ते प्रिया कडून तिचा फोन नंबर घ्यायचा विचार करतात.तेवढ्यात सगळ्यांची घरी जायची वेळ होते सगळे निघत असतात तितक्यात सर येऊन प्रियाचा फोन नंबर मागतात.प्रियाला समजत नाही सर अचानक नंबर का मागता आहे.तिला सरांनी चोरून बघितलेले आठवते आणि ती सगळ्यांसमोर सरांवर ओरडते. मी काही अशी तशी मुलगी नाही, सॉरी तुम्ही सर असले तरी मी तुमचं सगळ च ऐकेल या गैरसमजुती मधे राहू नका.पण प्रिया ,सर बोलतात. सॉरी पण मला काही ऐकायचं नाही म्हणून ती चालली जाते. सगळ्यांसमोर असा अपमान सरांना ही सहन होत नाही .ते ही काहीच न बोलता तिथून चालले जातात.इकडे केतकी प्रिया ला रागवते , प्रिया काय चाललय हे, तु अशी का ओरडली सरांवर ,सर किती चांगले आहेत आणि तु नुसता फोन नंबर मागितला त्यात येवढं काय झालं.तु चूप बस केतकी पहिल्या दिवसापासून बघते आहे सर चोरून चोरून माझ्या कडे बघत असतात मला आधी वाटलं माझा गैरसमज असेल तो पण आज तर फोन नंबर मागितल्यावर मला ते सगळ आठवल आणि माझ डोकंच फिरल .जाऊदे सोड चल आपल आपल घरी लवकर म्हणून प्रिया गाडी वर बसते .तितक्यात कार्तिक मागून पळत येऊन प्रियाला थांबवतो.प्रिया अग सर तुला वाढदिसानिमित्त विश करण्यासाठी तुझा नंबर मागत होते आणि तु हे काय केलं.तु त्यांचं काही ऐकूनही घेतल नाही त्यांना थोडांही बोलायचं चान्स दिला नाही आणि सगळ्यांसमोर येवढं बोलून गेलीस.कार्तिक थोडा रागातच बोलला.प्रिया ला ही तिच्या वागण्यावर खूपच लाज वाटली आणि सरांन बद्दल वाईट ही.मी आताच जावून सॉरी बोलले पाहिजे .ती लगेच सरांच्या केबिन कडे जाते .सर बाहेर येतच असतात.आय एम रियली सॉरी सर .काहीही विचार न करता मी काहीही बोलून गेली . तुमचं थोड ही ऐकून घेतलं नाही .खूप खूप सॉरी सर .सर काहीही न बोलताच निघून जातात.प्रियाला ही खूप वाईट वाटत.त्या ही घरी जातात.ती सगळ घडलेलं तिच्या आईला सांगते. तिच्या आईला ही सरां बद्दल फार वाईट वाटत.तिची आई तिला ही खूप रागवते.प्रिया रडायला लागते तिने ही कधी कोणाला असे काही बोललेले नसते .आणि सरांची चूक नसताना सगळ्यांसमोर त्यांचा येवढं अपमान केल्याचं तिला ही खूप वाईट वाटत.मग तिची आई तिला समजावते की रडु नको उद्या तुझ्या वाढदिवसा निम्मित सगळे मित्र मैत्रिणी आणि सरांना ही बोलव , सगळ्यांसमोर सॉरी सांग.तिला ही आईच म्हणणं पटल तिने लगेच कार्तिक ल फोन करून सरांचा नंबर मागून घेतला .तेव्हाच तिने सरांना फोन केला ...हॅलो कोण ? सरांनी विचारले. सर मी प्रिया.अस ऐकताच सरांनी फोन ठेवला.प्रिया ने परत फोन केले पण सरांनी उचललेच नाही.मग प्रिया ने कार्तिक कडून सरांचा पत्ता मागवून घेतला.दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर लगेच तयारी करून केतकी सोबत सरांकडे गेली .बेल वाजवली सरांनी डोळे चोळत च दरवाजा उघडला.समोर प्रिया आणि केतकी ला बघून सर शॉक झाले .तुम्ही? सरांनी प्रश्न केला.सर मी आज माझ्या वाढदिसानिमित्त सायंकाळी पार्टी ठेवली आहे तर तुम्हाला इनवाईट करायला आलो.याल ना तुम्ही प्रिया प्रश्न करते .बघेल सर सांगतात आणि दार लावून घेतात.प्रियाला वाईट वाटत की इतका बी काय राग. नाही तरी आली असते बोलवायला, प्रिया केतकी ला सांगते.प्रिया तु तर याहून वाईट वागली काल, साहजिकच राग येईल तेवढा.जाऊदे चल अस करून त्या चालल्या जातात.इकडे सरांना ही आपण बरोबर नाही वागलो अस वाटत.कमीत कमी दरवाजा असा लावायला नको होता तोंडावर अस वाटत. आज वाढदिवस होता तिचा. सर विचार करू लागतात. सायंकाळी जायचं ठरवतात. इकडे प्रिया घरी येऊन आईला सांगते ,मला नाही वाटत सर येतील आणि घडलेला प्रसंग सांगते . अग तू तुझ कर्तव्य केलय पुढे काय होईल त्याचा विचार नको करू आज तुझा वाढदिवस आहे मस्त रहा आणि चल जेवायला आज सगळं तुझ्या आवडीच बनवल आहे. प्रियाची आई सांगते.हो म्हणून जेवायला तर बसते पण तिच्या मनात सारखं तेच सुरू असत.तितक्यात बेल वाजते प्रिया दार उघडते तर समोर कोणीच नसत अचानक तिचं लक्ष खाली पडलेल्या गिफ्ट बॉक्स कडे जाते.ती उचलते पण त्यावर कोणाचे नाव वगैरे काहीच नसते म्हणून ती न उघडताच बाजूला ठेवून देते.आज वाढदिवस म्हणून ती दिवसभर फोन वर बिझी असते .सायंकाळ कुठे होते कळतच नाही .मग ती तयारी ला लागते, तेवढ्यात केतकी येते ,अरे वा प्रिया तु तर आज परीच दिसते आहे .बस ग काहीही काय प्रिया हसून देते.चला मग जायचं केतकी बोलते, त्या ठरलेल्या ठिकाणी जातात.सगळे जमतात पण सर आलेले नसतात..........

 

क्रमशः