स्वप्नांचे इशारे - 8 ️V Chaudhari द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नांचे इशारे - 8


प्रिया सरांच्या आवाजाने जाता जाता परत मागे वळून बघते.ती बघताच सरांचीही धक धक वाढते .पण कसे बसे सावरून ते बोलायला सुरुवात करतात.प्रिया ही कानात तेल टाकून ऐकत असते. मला वाटलं नव्हत प्रिया की माझी आणि तुझी मैत्री इतकी पक्की होईल.जातो तर आहे इथून पण तुझी खूप आठवण येणार. अ.....काही सांगणार असतात तेवढयात कार्तिक येतो , मे आय कम इन सर? दोघं ही थोडे सावरतात.येस कार्तिक येना .प्रिया तिथून निघून जाते त्यांचं बोलायचं परत राहून जात. प्रिया ला सर आवडायला तर लागतात पण तिला ते सरांना सांगायचं नसत ,कारण तिला माहित असत की त्या साठी तिचे आई बाबा कधी तयार होणार नाही आणि तिला ही त्यांना दुखवायचं नसत.सायंकाळ होते प्रोजेक्ट ची सर्व कामे पूर्ण झालेली असतात.आता सर ही जायला निघतात.प्रियाच्या डोळ्यात एकदम पाणी येत पण ती लगेच मनावर ताबा घेते आणि डोळ्यातलं पाणी डोळ्यामध्ये च थांबवते.सर निघून जातात .प्रिया आणि बाकी टीम ही आपापल्या घरी जातात.प्रिया आज खूप उदास असते आणि तिची आई हे लगेच ओळखते.काय झालं प्रिया ? आई विचारते.काही नाही आई, बस थोडी दमलिय मी ,माझ्या रूम मधे जावून लोळते थोड म्हणून तिच्या रूम मधे येते आणि लोळते. तिला आता सारखी सरांची आठवण येऊ लागते.पण काही केल्या सरांच आणि तीच मिळण शक्य नसल्याने ती सरांना विसरायचं ठरवते. सर पण तर तस कधी काही बोललेल नसतात.म्हणून तिला शेवटी त्यांना विसरण हाच पर्याय दिसतो.दुसऱ्या दिवशी ती ऑफिस ला जाते .सगळे असतात फक्त नसतात ते अविनाश सर.तिला ऑफिस ला आल्यावर सरांची जास्तच आठवण येऊ लागते .पण पुढच्या प्रोजेक्ट साठी त्यांना नवीन काम मिळालेलं असत .ती त्यात स्वतःला गुंतवून घेते.त्यातून थोडीही मोकळी झाली की परत सरांजवळ च्या आठवणी पुन्हा तिच्या डोळ्यासमोरून फिरून जातात.म्हणून ती स्वतःसाठी अजुन काहीस जास्तीच काम नव्या टीम लीड कडून मागून घ्यायची.असेच एके दिवशी तिचे वाढदिवसाचे फोटो बघत असताना सरांची खूप आठवण आली .खूप प्रयत्न करून ही तिला त्यातून निघता येत नव्हत .शेवटी तिने सरांना फोन करून सगळ सांगून द्यायचं ठरवलं.तिने सरांना खूप फोन केले खूप मॅसेज ही केले पण सरांनी काहीच रिप्लाय दिले नाही.हे बघून ती मनातून खूप दुखावली ,आपल्यालाच सरांची एवढी ओढ होती ,सरांना आपल्या बद्दल तसं कधी काही वाटलच नसेल या विचारांनी ती जास्तच उदास झाली.काही दिवस तसेच गेले.एक दिवशी रात्री सगळे जेवण करत असताना प्रियाच्या बाबांना केशव चा फोन येतो. काय रे कसा आहेस मजेत ना? प्रिया चे बाबा प्रश्न करतात.हो हो मी मजेतच .मी राजेश बद्दल बोलायला फोन केला होता .आज सकाळी ऑफिस मधे असताना मला त्याच्या बाबांचा फोन आला होता राजेश आला म्हणून, त्यांनी सायंकाळी राजेश ला भेटायला बोलवलं होत. राजेश ला भेटून आताच आलो घरी ,खूप छान वाटल त्याला भेटुन ,इतक्या मोठ्या पोस्ट वर असून सुध्धा अगदी आपुलकीने च बोलला आज ही, केशव सांगतो.प्रियाच्या बाबांनाही ते ऐकून फार बर वाटत.इकडे इतक्या दिवसा पासून राजेश ला विसरलेली प्रिया एकदम भानावर येते.तिने तर अजून राजेश चा फोटो ही पाहिलेला नसतो, एकीकडे अविनाश सरा कडे झुकलेले तिचे मन .एक क्षण वाटत की बाबां ना सांगून द्यावं सगळ पण सरांनी अजुन ही फोन केलेला नसतो आणि मॅसेज ही नाही ,पुन्हा पुन्हा फोन चेक करून ही तिच्या हाती नैराश्याचा लागते.म्हणून ती जे होतंय त्यालाच आपल नशीब मानून स्वीकार करते.तिकडे बाबांचा फोन सुरूच असतो. या रविवारी बघायचा प्रोग्राम ठेवायचं सांगता आहे काय करायचं ते प्रिया आणि तिच्या आईला विचारतात. आई तर लगेच होकार देते , प्रिया ही

उदास मनाने होकारार्थी मान हलवते.मग प्रियाचे बाबा केशव ला , रविवारी चालेल असा निरोप द्यायला सांगतात आणि फोन ठेवतात. अरे देवा आज तर शुक्रवार म्हणजे दोन दिवसात पाव्हणे येणार लवकर तैयारी ला लागावे लागणार , प्रियाची आई बोलते.