स्वप्नांचे इशारे - 3 ️V Chaudhari द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नांचे इशारे - 3

प्रिया प्रिया ....आईच्या आवाजाने प्रियाची झोप उघडते ...उठ ना बाळा आज ऑफिस ला जायचं ना, विसरलीस का ? आई बोलली ...म्हणत प्रिया ताडकन उठते आणि लगबगीने तयारी करते ..प्रिया खाली येते , देवघरा जवळ जावून देवांना नमस्कार करते ,तिच्या आई बाबांना नमस्कार करते...तितक्यात प्रीयाची आई नास्त्याची प्लेट लावते. प्रिया नाष्टा करून ऑफिस ला जायला निघते. तितक्यात तिची मैत्रीण केतकी तिची स्कूटी घेऊन येते ...चला निघायचं का प्रियु ? .....चल चल लवकर म्हणत प्रिया स्कूटी वर बसते.दोघी ऑफिस ला पोहचतात. ऑफिस चा पहिलाच दिवस म्हणून दोघीही आधी जोईनिंग फॉर्मलिटी पूर्ण करतात. नंतर त्यांना एका सिनियर कडून कामा बद्दल माहिती दिली जाते . त्यांना एका प्रोजेक्ट च्या टीम मध्ये घेतले जाते. दुसऱ्या दिवशी त्यांची टीम मेंबर्स जवळ मीटिंग असते.तिथं त्यांची ओळख बाकी टीम मेंबर्स जवळ होते रिना ,कार्तिक, मेघना जवळ . अजुन कोण आहे आपल्या टीम मध्ये आम्हाला काल सहा मेंबर्स आहे असे सांगितले गेले होते ..केतकी बोलते. कार्तिक सांगतो की सहावे आपले टीम लीड आहेत अविनाश सर ते अजुन आलेले नाहीत , येता आहे मग कामाची सुरूवात करूया. तेवढ्यात कोणी येत उंच , रुबाबदार, तेजस्वी चेहरा, ब्लॅक सूट मधे प्रिया त्याला बघते आणि क्षणभर बघतच राहते ....इकडे बाकीच्यांचे intro घेऊन सर प्रिया कडे वळता, ते काय बोलता त्याकडे प्रियाचे लक्षच नसते ,तेवढ्यात केतकी तिला धक्का देते आणि सर तुझ्याशी बोलता आहे सांगते.ती ही भानावर येते. सर तिला तीच नाव विचारात असतात. प्रिया सर, ती पटकन बोलते.ओके सांगून सर सगळ्यांची नावे जाणून घेतात आणि कामा बद्दल थोडक्यात सगळ्यांना समजवतात.सोबत हे पण की त्यांना त्यात एकही चूक झालेली चालणार नाही .तेवढयात सरांना कोणाचा फोन येतो आणि सर निघून जातात. तेव्हा केतकी प्रियाला चिडवत विचारते काय प्रिया कुठे हरवली होतीस.ती ही हसून सांगते नाही ग, तस काही नाही.पण ते सर किती तरुण आहेत मला वाटलं की कोणी वयस्कर सर असणार टीम लीड च्या पोझिशन वर. होना यार मला ही तेच वाटल होत पण बरेच आहे .वयस्कर असते तर तेवढेच स्ट्रीक्ट पण असते.चला कामाला लागूया आता म्हणून सगळे कामाला लागतात.थोडी काम झाल्यानंतर सर पुन्हा बघायला येतात की जसे सांगितले त्या प्रमाणे काम सुरू आहे की नाही. त्यांना प्रिया आणि कार्तिक चे नीटनेटके काम फार आवडते ते बाकीच्यांना ही

प्रिया आणि कार्तिक सारखे काम करण्याचे सांगतात .प्रिया खूप खूष होते .ऑफिस संपल्यावर प्रिया आणि केतकी घरी जायला निघतात. ऑफिसच्या थोडे पुढे येतात तेवढ्यात केतकी ची स्कूटी बंद पडते काय करावं त्यांनां काही सुचत नाही .जवळपास कुठे गॅरेज ही दिसत नाही.तेवढ्यात मागून एक गाडी येऊन त्यांच्यांबाजुला थांबते .ती गाडी बघून प्रिया खूप शॉक होते ती गाडी बघतच असते तेवढयात त्यातून अविनाश सर बाहेर येतात.काय झालं काही प्रॉब्लेम आहे का विचारतात.केतकी बोलते ,काही नाही स्कूटी ला काय झालं काही समजत नाही...अचानक बंद झाली.जवळ पास गॅरेज ही दिसत नाही. ओह चला माझ्या जवळ मी सोडून देतो .माझा ड्राइवर तुमची स्कूटी सुरू करून घेऊन येईल तुमच्या घरी, त्याला तुमचा घराचा पत्ता देवून द्या. थँक्यू सो मच सर केतकी खुश होऊन आभार व्यक्त करते. प्रिया मात्र तिच्याच विचारात हरवलेली असते , ती अजुनही खूप शॉक मधे असते. ती का एवढी शॉक असते आणि पुढे तिच्या जॉब आणि राजकुमाराचे काय होणार ते माहिती करण्यासाठी वाचत रहा .......पुढील भाग घेऊन येतोय थोड्याच दिवसात.....