The Author ️V Chaudhari फॉलो करा Current Read स्वप्नांचे इशारे - 4 By ️V Chaudhari मराठी कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books जर ती असती - 2 स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही... गोळ्याचे सांबार 🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिच... क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 1 व्हिक्टोरिया 405 भाग 1 भाग 1] कथेवाटे कोणत्याही धर्माला गालब... अनोळखी हनिमून "... गोष्ट प्रेमाची आणि प्रवासाची.....भाग १ ही एका मुलाची गोष्ट आहे ज्याचे नाव राहुल आहे. तो महाविद्यालय... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी ️V Chaudhari द्वारा मराठी कथा एकूण भाग : 8 शेयर करा स्वप्नांचे इशारे - 4 (1) 3.7k 7.1k सरांनी दोघींना गाडीत बसायला सांगितले. पण प्रिया तर तिच्याच शॉक मधे असते तितक्यात केतकी तिला हलवते तशीच प्रिया भानावर येते. काय झालं प्रिया कुठे हरवली आहे ,सर प्रश्न करतात? नाही नाही सर कुठे नाही प्रिया गडबडीने बोलते.चला मग लवकर बसा गाडीत आधीच उशीर झाला आहे सर सांगतात .प्रिया प्रश्नार्थक केतकी कडे बघते.केतकी रागात डोळे मोठे करते .प्रिया समजते की सर घरी सोडता आहे ....आता केतकी ला ही काही विचारायचं काम नाही ,नाही तर चांगलीच ओरडणार की लक्ष कुठे होत आणि तिला सांगावं लागेल आता चूप रहीलेलच बर. पण ही गाडी .. तीच कशी काय प्रिया परत विचारात पडते ...केतकी सरांना तिच्या घराचा पत्ता सांगते की एक राइट टर्न आणि मग माझं घर येईल.ओके आणि प्रिया च? सर प्रश्न करतात. मलाही केतकी कडेच सोडा , माझं घर तिच्या घरापासून जवळच आहे मी चालली जाणार, प्रिया सांगते.केतकी आश्चर्याने प्रिया कडे बघते.कारण तिला माहित असत प्रियाच घर तीच्या घरापासून बरच लांब आहे .केतकी काही बोलणार तेवढ्यात प्रिया तिचा हात हळूच दाबते आणि काही बोलू नको म्हणून इशारा करते. अग असं कस? सोडतो मीच. आता सरांना ती नाही सांगू शकत नाही. केतकी मात्र मिश्किल पणे हसते.तितक्यात केतकी च घर येत ती गाडीतून उतरते. तिला सोडल्यावर सर परत पत्ता विचारतात.प्रियाला काय बोलावं तेच सुचत नाही ,मघाशी बोललेल तीच खोटं आता पकडलं जाणार असत. खूप उशीर झाल्या मुळे ती रस्त्यात दुसरी कडे ही उतरू शकत नाही. ती त्या विचारातच असते, की अचानक सर गाडी थांबवता तशी ती घाबरते की अचानक येवढ्या सुण्या रस्त्यात सरांनी गाडी का थांबवली. आणि सरांकडे बघते. तिला आतापर्यंत नाही पण आता अचानक हृदयाची धक धक वाढल्याचे जाणवते.तेवढ्यात सर हसतात आणि विचारतात मॅडम आता तरी पत्ता सांगणार का ? पुढे जायचं कुठे हे माहित असल्या शिवाय गाडी चालवू कशी? ओह , हा , ते प्रिया अडखळत बोलते. तिला खोटं बोलली ते सांगावं त कस ते कळत नाही, म्हणून आधी सरळ सॉरी सांगते. अरे सॉरी का काय झालं प्रिया ? सर प्रश्न करतात. ते, मी , माझं घर इथे जवळ नाही लांब आहे मी उगाचच तुम्हाला त्रास नको म्हणून खोटं बोलली होती. ते तर मला आधीच माहीत आहे , सर हळूच पुटपुटतात.काय सर? प्रिया विचारते. काही नाही एवढंच ना, इट्स ओके प्रिया, सर बोलतात. सरांचं बोलण ऐकून प्रिया ही रिलॅक्स होते आणि पत्ता सांगते.आणि सुरू होतो प्रवास तिच्या घरा पर्यंत चा. प्रिया ही आता मोकळे पणाने बोलू लागते तिला अविनाश सरांचा स्वभाव हळू हळू आवडू लागतो .ते ही बोलायला व्यवस्थित असतात. तेवढयात प्रियाच्या बाबांचा फोन येतो, अग प्रिया कुठे आहेस तु एवढा उशीर कसा होतो आहे तुला ,ते प्रश्न करतात. आलीच बाबा पाच मिनिटात घरी येऊन बोलते ,येवढे सांगून प्रिया फोन ठेवते.बस बस सर आल माझं घर प्रिया सांगते. उतरताना सर प्रिया ला थांबायला सांगतात. ते त्यांच्या ड्रायव्हर ला फोन करून केतकी ची गाडी केव्हा भेटणार आहे विचारतात.त्यावर ड्रायव्हर सांगतो की उद्या दुपार पर्यंत भेटणार. ओके म्हणून फोन ठेवतात आणि प्रियाला सांगतात की तुमची गाडी उद्या दुपार पर्यंत भेटेल सकाळी ऑफिस ला कसकाय येणार म्हणून. प्रिया थोडी काळजीत येते कारण तिकडे लांब पर्यंत काही वाहन मिळत नाही कुठे जायला यायला.प्रियाच्या बाबांच ही ऑफिस असत त्यामुळे ते ही त्यांना सोडायला जावू शकत नाही.सर तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखतात.अग काळजी करू नको येईल मी उद्या ..जाताना तुम्हाला दोघींना घेऊन जाईल. नको नको सर आमच्या मुळे तुम्हाला परत त्रास नको. नाही ग त्रास कसला त्यात असही मी याच रस्त्याने जातो. हलकेच मंद हास्य करून मग प्रिया, ओके सर म्हणून सांगते आणि थँक्यु म्हणून आभार व्यक्त करते.सर जातात ती घरात जाते. तिच्या आई बाबांना उशीर झाल्याचं कारण सांगते.त्यात त्यांना सरांनी केलेल्या मदत बद्दल ही सांगते. जेवायची रोजची वेळ झाल्याने तिच्या पोटात आता कावळे ओरडू लागतात.आई अग जेवायला देना फार भूक लागली प्रिया सांगते. हो अग आणते पण तू आधी फ्रेश होऊन ये मग बसू जेवायला.प्रिया येते सगळे जेवायला बसतात. कसा होता मग आजचा दिवस तुझा , प्रियाचे बाबा विचारता.एकदम मस्त प्रिया सांगते. सगळ्यांचे जेवण होते. थोडा वेळ तिघे ही शतपावली करतात, छान गप्पा मारतात.चला आता झोपुया सकाळी परत लवकर उठायचे असते प्रिया बोलते. आई बाबा झोपायला जातात. प्रिया ही तिच्या रूम मधे जाते .झोपणार तेवढ्यात केतकी चा फोन येतो. काय ग प्रिया सरांनी काही सांगितलं का गाडी केव्हा द्यायला येणार त्यांचा ड्रायव्हर, केतकी विचारते. अग हो सॉरी तुला सांगायचं विसरली. सरांनी विचारल त्याला, तो बोलला की उद्या दुपार पर्यंत भेटणार गाडी .प्रिया सांगते. अरे यार मग आपण ऑफिस ला कस जायचं उद्या ? केतकी काळजीत पडते.तेवढ्यात प्रिया सांगते ,अग काळजी नको करू सर येणार आहे उद्या सकाळी आपल्या दोघींना घेऊन जाणार ऑफिस ला. काय ? केतकी आश्चर्याने विचारते.अग हो मी सांगितलं त्यांना, की नको म्हणून, पण त्यांनी ऐकल नाही.मग मी हो सांगितलं शेवटी.ओके ओके जाऊदे बर झाल असही आपल्याला कुठे काय मिळणार होते जायला ना बस ना कॅब ,केतकी सांगते. चल झोपते मग आता निवांत , बाय, गुड नाईट प्रिया. बाय , गुड नाईट केतकी. म्हणून दोघी फोन ठेवतात.प्रिया झोपणार तेवढ्यात तिला परत ती कार आठवते .ती परत विचार करायला लागते की अस कस काय शक्य आहे .मला स्वप्नांत दिसलेली तीच कार . तोच सेम कार चा कलर. जी कार तिने त्या दिवशी नदीकिनारी स्वप्नात पहिली होती.जो चेहरा त्या दिवशी बघता बघता राहून जातो तो चेहरा आज तिला समोर दिसतो .तिला तेव्हा सगळ जग थांबल्या सारखं वाटतं. पण ती काही बोलू शकत नव्हती कारण ती जागा ती वेळ त्या साठी योग्य नसते आणि त्यात तो समोरचा व्यक्ती तिचा ऑफिस मधला टीम लीडर असतो.तिला समजत नाही काय खर काय खोटं , जर स्वप्नात आलेला व्यक्ती अविनाश सर आहेत तर मग, इकडे ही तर तिच्या साठी राजेश ची गोष्ट सुरू आहे .दोघं फॅमिली ला पहिल्यांदा सगळ पटल आहे. तिला तिच्या आई वडिलांची मन दुखवायचे नसते.म्हणून ती ते स्वप्न विसरायचं ठरवते. ‹ पूर्वीचा प्रकरणस्वप्नांचे इशारे - 3 › पुढील प्रकरण स्वप्नांचे इशारे - 5 Download Our App