स्वप्नांचे इशारे - 5 ️V Chaudhari द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नांचे इशारे - 5

ती ते स्वप्न विसरायचं ठरवते. त्यात तिचा काही गैरसमज ही असू शकतो असा विचार करून. पण सरांचा चेहरा, त्यांची मदत, त्यांचं हसन , त्यांचं बघण सगळच जणू मनात ठसून जात. त्यांचा विचार करता करता तिला झोप लागते.सकाळी जाग येते ती आईच्या आवाजाने ,प्रिया....प्रिया उठ लवकर, ऑफिस ला जायचं नाही का ?..तशी ती पटकन उठते आणि तयारी ला लागते. तयारी करते, तिची आई नस्त्याची प्लेट लावते.प्रिया नस्त्याला बसते. नाष्टा करतच असते तेवढ्यात पुढे सरांची कार येऊन थांबते .तशीच अर्धा नाष्टा सोडून ,जायला निघते ....तेवढयात आई सांगते अग पूर्ण नाष्टा तर कर..नको म्हणून घाईत निघते.ती कार बघून तिच्या डोळ्यां समोर परत ते स्वप्न फिरून जाते...ती त्याकडे दुर्लक्ष करून गाडी जवळ जाते .बघते तर काय आज ही सरांचा ड्रायव्हर नसतो .सर एकटेच असतात. सरांना बघून तिच्या मनाची चल बीचल परत वाढते .पण ती स्वतःच्या मनावर कंट्रोल करून लगेच सावरते. हाय प्रिया... रेडी ना??? सर प्रश्न करतात.हो सर म्हणून प्रिया गाडीत बसते. आज ड्रायव्हर नाही तुमचा ? प्रिया सरांना विचारते. त्याला बर नाही आज म्हणून आला नाही . ओह ओके सांगून ती तिच्या मोबाईल मधे काही बघायला लागते .थोडा वेळ दोघेही शांत असतात.प्रिया बाहेर कसल्या आवाजाने वर बघते तेवढ्यात तीच लक्ष साईड मिरर मधे जात .सर लगेच त्यांची नजर फिरवतात. तिच्या नकळत सर तिच्याकडे बघत असल्याचं तिला जाणवत तशी ती जास्तच नर्वस होते.सर ही थोडे ओशाळतात. तितक्यात केतकी च घर येत. केतकी वाट बघत बाहेरच उभी असते. तिला बघून प्रियाला थोड बर वाटत. केतकी ही गाडीत बसते, त्या दोघांना येवढं शांत बघून , प्रियाला इशाऱ्यानेच विचारते काय झालं.प्रिया काही नाही म्हणून मान डोलवते. केतकी ला कामा बद्दल काही प्रश्न असतात ती ते सरांना विचारते .सर खूप चांगल्या पद्धतीने समजवतात.तेवढ्यात ऑफिस येते .दोघीही गाडीतून उरतात.सर ही गाडी पार्क करून येतात. प्रिया आणि केतकी ला सरांच्या गाडीत बघून बाकी टीम मेंबर्स जरा शॉक मधेच असतात.त्यात मेघना रिना ला सांगते मागच्या वेळेस तींची गाडी खराब झाली तेव्हा तिने सरांकडे लिफ्ट मागितली तरी दिली नव्हती.आणि या दोघींना कसकाय गाडीत बसवलं?त्यांच भाषांतर प्रिया ऐकते, पण त्याकडे दुर्लक्ष केलेले च बरे म्हणून ती न ऐकल्या सारखे करते.सगळे ऑफिस मधे जातात.अविनाश सर एक एकाला त्यांच्या केबिन मधे बोलवून कालच्या सगळ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतात आणि जे काही काम राहिली असेल ते काम लंच ब्रेकच्या आधी पूर्ण करायला सांगतात. त्या नंतर पुढच्या कामाबद्दल बोलू सर सगळ्यांना सांगतात. लंच ब्रेक होतो सगळे कँटींग मधे जातात.सर नाही आलेत अजुन म्हणून रिना विचारते.कार्तिक बोलतो सर इथे एकटे राहतात.त्यामुळे त्यांचा टिफीन नसतो .ते ऑनलाईन ऑर्डर करतात.येताना विचारून आलो ,ऑर्डर आली नव्हती त्यांची म्हणून आले नाही अजुन.तेवढयात प्रिया सांगते अरे तर त्यांची ऑर्डर येई पर्यंत आपल्याला जॉईन करायला सांगू. तेवढ्यात कार्तिक उठतो आणि सरांना लंच साठी बोलवायला त्यांच्या केबिन मध्ये जातो. बघतो त काय सर कामच करत होते. अरे कार्तिक तु ? बोल काय झाले .काही नाही सर तुम्हाला लंच साठी बोलवायला आलो होतो. अरे हो मी ऑर्डर केले आहे येईल थोड्या वेळात .तुम्ही करून घ्या मी करेल नंतर . अरे सर अस कस चला ना आमचा आहे ना टिफीन तुमची ऑर्डर येते तोपर्यंत आम्हाला जॉईन करा.कार्तिक सरांना जबरदस्तीने घेऊन जातो. सर सगळ्यांचा टिफीन आवडीने खातात.नंतर सगळे आपल्या जागेवर जायला निघतात.सगळे जातात प्रिया आणि केतकी की उठून जायला निघतात तेवढयात केतकी प्रियाला सांगते किती छान आहे ना सर , टीम लीड आहे पण अगदी मित्र सारखे राहतात .प्रियाला ही सरांचा अस मनमोकळे पना आवडतो. बर झाल तू सरांना आपल्या जवळ जॉईन व्हायचं सांगितलं. बघ ना सरांची ऑर्डर अजुन आली नाही.केतकी प्रिया ला सांगते. त्यांचं हे सगळ बोलण सर ऐकतात आणि सरांना प्रियाने कार्तिक ला पाठवल्याचे कळते. सरांचा हातरुमाल कँटिन मधे राहून गेलेला असतो तोच घेण्यासाठी सर परत येतात पण प्रिया आणि केतकी च तिकडे लक्षच नसत.त्या दारात यायच्या आधी सर पटकन दारा मागे लपतात.त्या गेल्यावर सर हातरुमाल घेतात आणि त्यांच्या केबिन मधे जातात.....क्रमशः