ॲ लि बी. (प्रकरण ८)

  • 9k
  • 1
  • 4.7k

ॲलिबी ( भाग ८): प्रकरण ८आदिती हुबळीकर ला भेटून काहीच निष्पन्न न झाल्याने पाणिनी वैतागूनच ऑफिस मधे परत आला तेव्हा काय झालं ते जाणून घेण्यासाठी सौम्या ने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.त्याने तिला सर्व इत्यंभूत सांगून टाकलं.“ ओजस सांगत होता की त्याची माणसे टेंबे बाईच्या मागावर होती, त्यातून ते तुम्हाला अपेक्षित असलेल्या, माणसा पर्यंत म्हणजे अनाथाश्रमाच्या सेक्रेटरी पर्यंत पोचले. आदिती हुबळीकर ने ब्युटी पार्लर मधे जाण्यापूर्वी , आपल्या जाहिरातीला जे उत्तर पेपरवाल्यांना देण्यासाठी दिले होते त्याची प्रत ओजस ने मिळवली आहे.” सौम्या ने माहिती पुरवली.“ काय लिहिलंय उत्तरात? ” - पाणिनी“ परिस्थितीत बदल नाही. सध्या मुलाखत करणे किंवा भेटणे शहाणपणाचे नाही.तुम्ही