Anahoot Savat

  • 15.7k
  • 1
  • 6.8k

ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली गेली असून, त्याचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीच संबंध नाही तसेच स्थळ-तारखा जुळून येणे हा केवळ योगायोग मानावा.*********************************** 2 फेब्रुवारी 2017......... पावसाने चांगलाच जोर पकडला होता . सर्वत्र काळोख पसरला होता . रात्रीच्या प्रहरी तो परिसर अजूनच भयावह वाटत होता . रातकिड्यांची किर्र किर्र व पावसाची रिपरिप ह्या व्यतिरिक्त कसलाच आवाज कानावर पडत नव्हता . भयाण शांततेने जणू त्या परिसराला चहू बाजूंनी व्यापून टाकलं होतं . ती जीवघेणी शांतता कसल्याश्या आवाजाने भंग पावली . तो झपझप पावलं टाकण्याचा आवाज होता . तो माणूस जीवाच्या आकांताने धावत होता . तो दर दोन मिनिटांनी मागे वळून बघत