संत एकनाथ महाराज गंगेने ग्रंथ झेलला - १८

  • 4.7k
  • 1.6k

श्री संत एकनाथ महाराज १८ एकनाथी भागवत - श्लोक ८ वा प्रवृत्तिलक्षणे निष्ठा पुमान्यर्हि गृहश्रमे । स्वधर्मे चानुतिष्ठेत गुणानां समितिर्हि सा ॥८॥ पुरुषासी जो गृहाश्रम । तो जाणावा केवळ काम । तेथ नित्यनैंमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ॥५१॥ गृहाश्रमीं हिंसा पंचसून । यालागीं तमोगुण प्रधान । गृहीं स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण या हेतू ॥५२॥ नित्यनैमित्तिक स्वधर्म । हें गृहस्थाचें निजकर्म । हें चित्तशुद्धीचें निजवर्म । सत्व सुगम या हेतू ॥५३॥ गृहाश्रमप्रवृत्ति जाण । सदा मिश्रित तिनी गुण । गुणीं गुणवंत करुन । कर्माचरण करविती ॥५४॥ न रंगतां तेणें रंगें । स्फटिक तद्रूप भासों लागे । तेवीं गुणात्मा गुणसंगें