श्री संत एकनाथ महाराज- - १९

  • 5.9k
  • 2k

श्री संत एकनाथ महाराज १९ स्लोक १२ सत्त्वं रजस्तम इति गुणा जीवस्य नैव मे । चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो निबध्यते ॥१२।। बांधोनि नाणितां आया । जेवीं देहाधीन असे छाया । तेवीं भगवंताधीन माया । नातळोनियां वर्तवी ॥९२॥ माया वर्तविता निवर्तविता । स्वामी भगवंत तत्त्वतां । यालागीं मायाअध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥९३॥ सूर्य अंधारातें नाशी । परी तो संमुख न ये त्यापाशीं । तेवीं मायनियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नव्हे ॥९४॥ माझें जें देखणेपण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण । मजपाशीं माया जाण । गुणाभिमानेंसीं नाहीं ॥९५॥ मायाबिंबित चैतन्य । त्यासी बोलिजे जीवपण । त्या जीवासी त्रिगुणीं