श्री संत एकनाथ महाराज - २१

  • 7.6k
  • 2.3k

श्री संत एकनाथ महाराज—२१ एकनाथी भागवत - श्लोक २१ वा उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः । तमसाऽधोऽध आमुख्याद्रजसाऽन्तरचारिणः ॥२१॥ सत्वगुणाचें आयतन । मुख्यत्वें ब्राह्मण जन । ते न करुनि ब्रह्मार्पण । स्वधर्माचरण जे करिती ॥९२॥ त्यांसी स्वधर्माच्या कर्मशक्तीं । ऊर्ध्वलोकीं होय गती । लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥९३॥ स्वर्गलोक महर्लोक । क्रमूनि पावती जनलोक । उल्लंघोनियां तपोलोक । पावती सात्विक सत्यलोक पैं ॥९४॥ वाढलिया रजोगुण । शूद्रादि चांडाळपण । पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥९५॥ वाढलिया तमोगुण । पश्चादि योनि पावोन । दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण भोगवी ॥९६॥ प्राण्यासी अंतकाळीं जाण ।