२६. पवनची सुटका आणि आकाशची भेट .. तीन वाजून गेले होते आणि मी तिथेच अडकून बसलो होतो.इथे थांबण्यापेक्षा हातपाय हलवलेले बरे असे समजून मी चालण्यास सुरुवात केली.काही झाडांना सारत, वाकत,बागत एखादी पायवाट शोधण्याचा प्रयत्न करत होतो.तोच समोर पाण्याचा खळखळ असा आवाज कानावर आला.जवळपास ओढा किंवा नाला असावा या आशेने मी जरा पावले तेजीने मापली. पावसाळी दिवसांत इथून तिथून पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तयार होतात.पुढे घसरणीला लागून त्यांचा एका ओढ्यात रूपांतर होतो.आणि परत त्यांचा रूपांतर एका नाल्यात होतो.आणि पुढे जाऊन हाच नाला एखाद्या तलावाला जाऊन मिळतो.जोपर्यंत त्याचे रूपांतर ओढ्यातून नाल्यात होत असते तोपर्यंत इतरही जागून छोटे छोटे ओहोळ त्याला येऊन मिसळत