रात्र खेळीते खेळ - भाग 2

  • 16.4k
  • 1
  • 9.6k

रात्र खेळीते खेळ भाग 2ये अधिराज अरे ये कि इकडे केव्हाची वाट पाहतोय तुझी किती उशीर केलास अस म्हणत म्हणत त्याच्या समोर हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तिथे येवून उभा राहिला. डोक्याला मार लागलेला. डोळे पांढरे झालेले, हातावर जखमाच जखमा झालेल्या. एक पाय तुटलेला हातात घेऊन तो तसाच त्याच्या दिशेने येत होता. अधिराज तर मनातून हालूनच गेला होता. एकिकडूण त्याच्याकडे पाहताच धडकी भरत होती तर दुसरीकडून विचार घोळत होते. अरे हा तर माझ्यासारखाच दिसतो पण हा नेमका आहे तरी कोण. मी तर एकटाच आहे. माझा कोणी भाऊ पण नाही जूळा मग हा आपल्यासारखा कसा काय दिसत आहे. अरे अस काय बघतोयस