रात्र खेळीते खेळ भाग 2
ये अधिराज अरे ये कि इकडे केव्हाची वाट पाहतोय तुझी किती उशीर केलास अस म्हणत म्हणत त्याच्या समोर हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तिथे येवून उभा राहिला. डोक्याला मार लागलेला. डोळे पांढरे झालेले, हातावर जखमाच जखमा झालेल्या. एक पाय तुटलेला हातात घेऊन तो तसाच त्याच्या दिशेने येत होता. अधिराज तर मनातून हालूनच गेला होता. एकिकडूण त्याच्याकडे पाहताच धडकी भरत होती तर दुसरीकडून विचार घोळत होते. अरे हा तर माझ्यासारखाच दिसतो पण हा नेमका आहे तरी कोण. मी तर एकटाच आहे. माझा कोणी भाऊ पण नाही जूळा मग हा आपल्यासारखा कसा काय दिसत आहे.
अरे अस काय बघतोयस स्वतः हालाच अस निरखून निरखून अस तो मुलगा म्हणू लागला आणि हळूहळू आणखीनच जवळ येवू लागला. ये थांब तिथेच थांब जवळ येवू नको माझ्या.
अरे अधिराज अस काय म्हणतोस स्वतः हापासूनच का दूर पळत आहेस. अरे मी म्हणजेच तर तू आहेस अरे कालच तुला तुझ्या जवळ बसलेल्या माणसान ओढत ओढत नेल आणि तिथच तुला बांधून ठेवून तुझ्या पायावर चाकू चालवला आणि हातांवर पण वार केले विसरलास का सगळ. अरे तू संपलायस आणि आता जे तू मला पाहत आहेस तो तुझाच देह म्हणजे तूच आहेस आणि तू त्यातून बाहेर पडलायस म्हणूनच म्हणतोय तू ये परत माझ्या आत ये.
अधिराज प्रचंड घाबरला त्याला वाटल अस कस घडल आपल्याला काहीच का आठवेना. तोपर्यंत तो अधिकच जवळ येवू लागला तस नाही नको नको येवू तू माझ्याजवळ जा जा दूर जा माझ्यापासून अस करत करत अधिराज दूर पळत पळत चालला.
तसा तो मुलगा म्हणू लागला अरे जाशील कोठे पळून तुला परत परत येतेच यायच आहे. तुला अस कस सोडेन मी. अस म्हणून हसू लागला. आणि मध्येच अरे ये कि अधिराज हा तुझाच देह आहे त्यातूनच दूर गेलास तर मला जिवंत कस करणार तू.
अधिराज मात्र चांगलाच घाबरला होता त्याला स्वतः हाला अशा अवस्थेत पाहून स्वतः हाचीच दया येत होती. पण तो तसाच पळत राहिला आणि तितक्यात त्याला परत नदीचा आवाज येवू लागला तो परत पुढे जाणार तोच त्याला मागून कोणीतरी ढकलल आणि तो तसाच एका दगडावरती पडला. .........
त्या आजोबांनी मुलांसाठी गरमा गरम झुंका भाकरी केली. तस ते त्या घरात एकटच राहायचे त्यांच्या बायकोला ब्लड कॅन्सर होता त्यातच त्या दगावल्या होत्या.
ते आजोबा पोरांना म्हणले पोट भर खावा पोरांनो तेवढ मला बी आणखी भारी चव येईल तुमच्या स्वादाने.
काय काय म्हणालात काय ? कावेरी विचारू लागली. अरे मी म्हणल पोट भर खावा म्हणजे अंगात तरतरी येईल आणि झोप पण नीट लागल तुम्हासनी.
कावेरीच्या मनात मात्र प्रश्नच प्रश्न उगवत होते. हे आजोबा इथे एकटे कस राहत असतील? त्यांच वागण कधीकधी इतक विचित्र का वाटत? आणि ही जागा या आधीही पाहिली आहे अस का वाटत तसच. तस तर आम्ही इथ कधीच आलो नाही.
बाकिचे मात्र जेवणाचा आस्वाद घेत आपापसात गप्पा मारत होते. त्यांची तर येथे येण्याआधी त्या माणसाला बघून भितीने सारी भूकच मेली होती. वाचण्याची शाश्वतीच वाटत नव्हती त्यांना.
पण त्या भाकऱ्या बघूनच पुन्हा नवा जोश आला होता. तसच ते गप्पा मारत मारत झालेल सगळ विसरण्याचा प्रयत्न करत होते.
ते आजोबा मात्र एकटक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते.
जस कि खूप मोठ सावज हाती लागलय आणि आपण शिकारीच्या तयारीत आहोत. असे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत होते.
तेवढ्यात राजच लक्ष गेल तोच आजोबा सावध झाले आणि मायाभरल्या डोळ्यांनी पाहू लागले आणि म्हणाले मला माझ्या पोरांची आठवण झाली ती बी आज असती तर तुमच्या येवडीच असती बघा.
म्हणजे आजोबा तुम्हाला मुल आहेत पण मग कोठे असतात ती परगावी शिकायला आहेत काय? अनुश्री विचारू लागली.
अग पोरी आता नाहीत ती .
ती कधीच सोडून गेलीत आता हयात नाहीत.
म्हणजे काय झाल ओ त्यांना आजारी होतीत का ती राज विचारु लागला.
नाही आजारी नव्हती एकदा पोलिस आले होते इथे त्यांना कोणीतरी सांगितलेल कि इथ मुलांचा बाजार भरतो व त्यांची विक्री केली जाते. मग त्यांनी येथे छापा टाकलेला आणि आम्हा नवरा बायकोला घेऊन ते पोलिसात पोचलेले.
मग आजोबा नंतर काय झाले तुम्ही कसे सुटला अग जेव्हा कळाल ती बातमी खोटी आहे तेव्हा त्यांनी आम्हाला सोडून दिले. पण त्याला फार उशीर झाला होता आमच्या पोरांनी आम्ही येण्याआधीच आत्महत्या केली.
हे ऐकून तर त्या चौघांच्या डोळ्यात पाणी भरले. वीर म्हणाला आजोबा तुम्ही रडू नका आम्हाला तुमची पोर समजा. अस म्हणत आजोबांना धीर देण्यासाठी तिघांनी त्यांना मिठी मारली. आणि तो आजोबा मागून हळूच हसू लागला. कावेरीला मात्र मनात शंकाच येत होती.