रात्र खेळीते खेळ भाग 4
टक टक टक टक असा आवाज येवू लागला तस कावेरीला जाग आली ती तशीच झोपल्या जागेवरून उठली. तस आवाज कोठून येत आहे याचा वेध घेवू लागली. तस तिला त्या बाजूच्या खिडकीतून आवाज येत असल्यासारख जाणवल ती हळू हळू पुढे जावू लागली. तस आवाज आणखीच जोरात येवू लागला.
तस तर आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. सगळ्यांनी झोपताना दिवे मालवले होते.
तीचा पाय कशाला तरी आदळला आणि ती खाली पडली व तसच स्वतः हाला सावरत परत उठली.
मगाशी वाढत जाणारा आवाज कमी ऐकू येवू लागला तस तिला वाटल आपण बहुतेक चूकीच्या दिशेने चाललोय. आधी आपला मोबाईल शोधूया कमीत कमी टॉर्चच्या प्रकाशात तर काय तरी दिसेल.
ती परत तीच्या जागेवर तशीच धडपडत गेली व मोबाईल शोधू लागली पण तिला काही केल्या मोबाईल सापडेना. तस बाहेरून परत तसाच आवाज येवू लागला. अरे काय आहे. कसला आवाज आहे हा. आणि हे सगळे कसले कुंभकरणासारखे झोपलेत. एक पण कोण उठेना या आवाजाने. आपल्याला मात्र झोपच येईना झाले. जावू दे यांना तर सकाळी बघू आपण आधी या आवाजाचा शोध लावू.
ती परत मोबाईल शोधू लागली तोवर तिच्या हाताला काय तरी जाणवल. जस कि जवळून काहीतरी वळवळत गेल. तिला काय करायच तेच कळेना परत तसाच भास झाला तशी ती हात जवळ ओढू लागली पण तिला हात जवळ घेताच येईना. जणूकाही कोणीतरी घट्ट धरून ठेवलाय किंवा कशाला तरी बांधलाय. ती परत प्रयत्न करू लागली पण काही केल्या तिला हात जवळ घेता येईना तीला अचानक रडायला यायला लागल. तोवर समोर अचानकच त्या भिंती दिसू लागल्या. आणि तिच्या अवतीभवती फिरू लागल्या जणूकाय त्या भिंती तिच्यासोबत खेळतच आहेत. त्या चित्रातला तो खूणशी नजरेने पाहणारा माणूस त्या भिंतीतून चालत चालत तिच्याच दिशेने येवू लागला. तशी तिच्या मनात धडकिच भरली. ओरडायला पण तिने तोंड उघडले पण तिच्या तोंडातून आवाजच येईना. समोरून तर मृत्यू आणखी जवळ येताना दिसत होता पण तिला पळताच येईना जणू काय कोणीतरी तिचे पाय पण बांधून ठेवलेत. ती हतबल होऊन तशीच उभी राहिली.
अचानक काय झाले काय माहिती तिच्या कानावर भजन ऐकू आले एका स्त्रीच्या मंजूळ आवाजातले आणि ते समोरच दृष्य सगळ अदृष्य झाल.
ती आजूबाजूला बघू लागली तर सगळ आधी जस होत तसच होत न समोर त्या भिंती दिसत होत्या न समोरून येणारा तो माणूस दिसत होता. न हाताला कोणी बांधल होत ती हातांची हालचाल सहज करू शकत होती. तिला समजेनाच कि मगाशी आपण जे पाहिले ते सत्य होते कि आता जे पाहतोय ते सत्य...... असो पण काय पण आवाज तर शांत झाला आता झोप तर लागेल.अस म्हणून कावेरी झोपू लागली तोवर परत टक टक टक टक आवाज चालू झाला.
यावेळी मात्र ती ने मनाचा निर्धार केला आता काहीही होवू दे आपण कोठेच जायच नाही. ......
अचानक अनुश्रीला कोरड पडल्यासारखी वाटू लागली म्हणून ती तशीच डोळे चोळत चोळत उठली.
काय यार इतकि भारी झोप लागलेली तोवर कसली तहान लागली आपल्याला आता पाणी प्याव लागेल.
ती न बाजूला ठेवलेला जग हातात घेतला तर त्यातल पाणी संपलेल.
काय यार हे सगळे एक तर जग भरून ठेवायला कोण तयार नव्हत आणि रिकामा मात्र लगेच केला. शीट यार आता बाहेरच्या खोलीत जावून पाणी आणाव लागेल. पण बाहेर जाणार तर कस कसला अंधार आहे काय दिसत तर नाही. अस म्हणत ती मोबाईल शोधू लागली. आणि परत शीट यार या तर कायच चार्जींग नाही घ्या आता भोगा आपल्या कर्माची फळ काय उशीरापर्यंत मोबाईल घेवून बसतात अस स्वतः हावरच ओरडून दिवा शोधू लागली बाजूलाच एक दिवा दिसला. ती ने उशीजवळची काडेपेटी घेतली तिला नेहमी जवळ काड्यापेटी घेवून झोपायची सवय होती. कारण तिला कायमच अशी रात्रीची तहान लागायची मग काय पाणी प्यायला उठाव लागायचं.
ती ने काड्यापेटीने दिवा लावला व हळू हळू पुढे जावू लागली.
ती ने खोलीचा दरवाजा हळूच उघडला आणि पुढे जावू लागली पण तिला बाहेर येताच जास्तच भिती वाटू लागलेली कालच त्या भिंतीवरच चित्र आठवून घाम फुटत होता पण ते नूसत चित्रच आहे अशी स्वतः हालाच समजूत घालून ती पुढे चालू लागली तोवर त्या भिंतीजवळ येवून पोहोचली. पण ती ने ठरवलेल कि आपण घाबरायच नाही अस म्हणतच ती पुढे जावू लागली. ती ने चित्रांकडे बघणच टाळल पण तरीही भिती वाटतच होती. ती त्या खूणशी नजरेने बघणाऱ्या माणसाच्या चित्राजवळून पुढे गेली व अचानकच कोणीतरी जोरात मागे ओढले तीला काही कळायच्या आतच त्या भिंतीने स्वतः हात सामावून घेतले. ................