रात्र खेळीते खेळ - भाग 9 prajakta panari द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

रात्र खेळीते खेळ - भाग 9

अनुश्री त्या स्त्रीकडे पाहून स्तब्धच झाली. तिला तिच्याकडे बघून अस्पष्ट अशी दृष्य दिसू लागली पण व्यवस्थितरित्या आठवेना कि हि नक्की कोण आहे.. पण तिला तिच्याविषयी आपलेपणाची भावना जाणवू लागली त्याच कारण तिलाच माहिती नव्हत... ती तर नेमक आपल्याला या स्त्रीविषयी आपलेपणा का जाणवतोय याचा विचार करत होतीच कि त्या स्त्रीने तीच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून तिला भानावर आणले....
काय ग कसला एवढा विचार करतेस.... तीच्या या प्रश्नाने अनुश्री गोंधळलीच .....
न न न नाही कसला नाही...
बर मला वाटत तु खूप थकली असणार आतापर्यंत ज्या संकटांना तोंड देवून आलीस त्यामुळे तु आत चल आपण थोड मोकळ होवून बोलू तसही अजून धोका टळला नाहीय.... त्यामुळे जास्त वेळ बाहेर थांबन धोक्याच आहे.... आत गेल्यावर सुरक्षितरित्या मला तुझी मदत करता येईल....
बर चला मग चालेल आपण आत बोलू अस म्हणून अनुश्री ती च्या पाठोपाठ जावू लागली....
अनुश्री जाता जाता आजूबाजूच दृष्य न्याहाळू लागली... इथे अंधाराच प्रमाण थोड कमी होत त्यामुळे तिला मनातून थोड हायस वाटू लागल अधिराज हरवल्यापासून म्हणजे त्या जंगलात आल्यापासून त्यांना फक्त अंधारच दिसला होता.
तीला तिथे जाता जाता थोडी सकारात्मकता जाणवू लागली त्या परिसरात असंख्य नारळाची झाड होती, भोपळीचा वेल होता, पक्ष्यांची घरटी होती एका झाडावर तर एक पक्षी आपल्या पिल्लांच्या चोचीत दाणा भरत होता तिला ते पाहून सगळ्या मित्रांची आठवण येवू लागली ते पण असच एकमेकांना घास भरवत रोज जेवायचे. ती च्या डोळ्यात तर नकळत पाणीच येवू लागल... तोवर ती स्त्री तिच्या जवळ येवून तीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली.. धीर नको हरू सगळ ठीक होईल... तस अनुश्रीने त्या स्त्रीला मिठीच मारली.. का माहिती का पण तिला त्या स्त्रीला पाहिल्या पासून अपार माया जाणवत होती तिला तिच्या मिठीत पण माया जाणवली....

ती त्या स्त्रीसोबत एका खोलीत गेली.. तस अनुश्री विचारू लागली बर आता मला सांगाल का मी माझ्या मित्रांना कस वाचवू ते....
अग थांब खूप थकली असशील थोड पाणी पिऊन घे आणि थोड जेवून घे..... ती स्त्री म्हणाली...
तस अनुश्री म्हणाली नाही नको मला काही जाणार नाही मला आता माझ्या मित्रांना भेटायच आहे. तस तर ते पण अन्न पाण्यावाचून तळमळत असतील....
अग मी समजू शकते सध्या तुला तुझ्या मित्रांव्यतिरिक्त काहीच सुचत नाही पण जरा बघ किती अशक्तपणा दिसालाय चेहऱ्यावरूनच थोड काहीतरी खा....
नाही नको मला काहीच नको......
बर पण थोडा सरबत तरी घे माझ्या समाधानासाठी तरी थोडी ताकद येईल तुझ्यातच.....
आता अनुश्रीला ती ला नकार देण जमल नाही कारण ती इतक्या कठीण काळात आपली मदत करत आहे व आपल्याला धीर पण देत आहे ते बघून .......

अनुश्री ने त्या स्त्रीने दिलेला सरबत संपवला तस त्या स्त्रीला बर वाटल.... आता ती स्त्री अनुश्रीशी बोलू लागली....

बर ऐक आता मी तुला जे सांगणार आहे ते लक्ष्यपूर्वक ऐक खरतर मी तुला आता भुतकाळ सांगणार आहे... मला तुला मार्गच सांगायचा होता पण आमच्यावर काही बंधन आहेत त्यामुळे मी तुला डायरेक्ट मार्ग नाही सांगू शकत... पण तुला भुतकाळातूनच बऱ्याचशा गोष्टी समजतील... आणि हा तुम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी एकत्र तर याव लागेल.... तस तु एकटी बाहेर पडू शकतेस कारण तु या मार्गापर्यंत पोहोचलेस... जर तुला एकटीला बाहेर पडायच असेल तर सांग तुला आता बाहेर काढू शकते मी त्यामुळे तुझा जीव धोक्यात न येता सहीसलामत बाहेर पडशील तु...

नाही भलेही कितीही संकटात अडकायला लागू दे मला माझ्या मित्रांना सोडून एकट बाहेर पडायच नाही.... गेलो तर सगळेच बाहेर जावू.... हे ऐकून त्या स्त्रीच्या डोळ्यात पण पाणी आल ती मनातच म्हणाली तुमच्या मैत्रीतील हे प्रेमच तुम्हाला यातून बाहेर काढेल व आमची पण मुक्तता करेल....

ती स्त्री आता अनुश्रीला भुतकाळ सांगू लागली...

आजपासून पाच वर्षा आधी घडलेली घटना आहे... या जंगलात राहायला एक माणूस आला. खरतर तो खूप विचित्र आणि पाषाणहृदयी होता.. तो लहान लहान मुलांना उचलून आणायचा त्यांच्याकडून जबरदस्ती कुकर्म करून घ्यायचा व नंतर त्याच मुलांना दूर ठिकाणी नेऊन विकायचा व भरपूर पैसे कमवायचा... यातूनच त्याने एक भव्य घर बांधल व सोन्या चांदीच्या वस्तू तयार केल्या... त्याचे हे कारनामे दोन वर्ष चालू होते... पण दोन वर्षानंतर अशी एक घटना घडली कि त्यांना ती मुले तर गमवावी लागलीत व स्वतः चा जीव पण गमवावा लागला...... सोबतच त्याच्या बायकोचा पण अंत बघावा लागला....

अनूश्री विचारू लागली पण अस काय झाल नेमक दोन वर्षानंतर सांगते ऐक..... त्यांनी दोन वर्षांनंतर असच मैदानात खेळणाऱ्या सहा मुलांना उचलून आणल त्यांना कस फसवून एकदम उचलून आणल हे तर नाही माहिती पण त्यांना उचलून आणल हे मात्र खर........

ती मुल जवळजवळ सात वर्षाची होती पण हा खूपच हुषार होती. ती मुल जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा पहिल्यांदा तर खूप घाबरली तिथल ते सगळ दृष्य पाहून ती हरामी माणस त्या मुलांना दगडावर हातोडीने जस घाव घालावेत तस लोखंडाने यांनी जस सांगतील तस केल नाही तर मारायचेच मारायचे... ती सगळी मुल खूप हतबल झालेली... त्यात आता हि सहा मुल त्यांच्या हाती लागलेली..... पण त्या माणसाला मात्र ती मुल कशी आहेत हे नाही जाणवल ती मुल बाकिच्या मुलांपेक्षा चालाख होती फक्त सात वर्षाची असून पण.....

इकडे त्या मुलांची आई त्यांना शोधत होती सारख पोलिसात जावून विचारणा करत होती पोलिस पण त्यांचा शोध घेत होते....
त्या मुलांना एका वेगळ्या खोलीत डांबून ठेवले होते. नंतर बंदोबस्त करता येईल म्हणून.....
ती मुलग खिडकीतून रोज त्या गोष्टी बघायचे कि कस त्यांच्याकडून नको ती काम करून घेतली जातात कस त्या निष्पाप मुलांना छळल जात.... त्यांनी त्या मुलांना बाहेर काढायच ठरवल....

त्यांनी त्या माणसाकडे जे लोखंड पाहिलेल ते हळूच आणायच अस ठरवल पण कस आणायच हा एक प्रश्न होता. त्यानूसार त्यांनी एक योजना बनवली... ते एकमेकांवर जस दहीहंडी करायला उभे राहतात तसे राहिले व उंचावर असलेली खिडकी उघडली त्यातून त्यांनी त्यांच्या एका मित्राला पळत जाऊन पोलिसांना घेऊन यायला सांगितले.... व दुसऱ्या मित्राला लोखंड घेऊन येण्यासाठी पाठवल ते दोन्ही मित्र चालाख होते एक जण नजर चुकवत चुकवत खरच पोलिस स्टेशनमध्ये गेला.. व दुसरा लोखंड घेऊन हळूच दरवाजा उघडून आत आला.. अचानकच त्या माणसाची बायको त्यांच्या खोलीपाशी आली तस ती ला ते दार बाहेरुन उघड असल्याच दिसल... तीच्या मनात संशय डोकावला व ती दार उघडून आत आली. व पाहते तर सगळे जण गाढ झोपलेले तिला वाटल ती चा नवराच कडी लावायची विसरून गेला व ती ने बाहेर जावून कडी लावली...

तोवर त्यांच्यातली एक मुलगी म्हणू लागली अरे आता काय करायच दार तर उघडता नाही येणार मग यांना बाहेर कस काढायच असा विचार करत असतानाच त्या मुलीला एक आइडिया सुचली ती ने लगेच ती सगळ्यांना सांगितली....

ती जोरजोरात दरवाजा ठोठावू लागली वाचवा वाचवा म्हणून तस त्या माणसाची बायको लगेच पळत तिथे आली ति ने दरवाजा उघडला व विचारू लागली काय ग थेरडे काय झाल तुला एवढ्याने ओरडायला तस ती म्हणली वॉशरूम वॉशरूमला जायचय... तस ती स्त्री चल माझ्या मागून ये अस म्हणू लागली व पाठमोरी वळली तस ती ने ती च्या डोक्यात ते जे कसल लोखंड होत ते घातल.. ती तशीच बेशुद्ध पडली तस त्यांनी त्या मुलांना बाहेर काढल व बाहेर पाठवल ती मुल पळत पळत बाहेर गेली... आता ही पोर पण जाणार होती तोच ती त्या माणसाची बायको शुद्धीवर आली... व तो माणूस पण तसाच दारात उभा होता चिडलेल्या अवस्थेत...