रात्र खेळीते खेळ - भाग 10 prajakta panari द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रात्र खेळीते खेळ - भाग 10

ती पाच जण तिथून पळून जाणार तोच समोर तो माणूस चिडलेल्या स्वरूपात उभा होता आणि त्याची बायको सुद्धा शुद्धीवर आली होती. बाकिची मुल तिथून कधीच पसार झालेली त्यामुळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसून येत होता या सगळ्यांना खाऊ कि गिळू अस झालेल त्यांना....
ती सगळी तर पुरती गोंधळून गेली आता पुढे काय करायच हेच त्यांना कळेना.....
मागून पळाव तर त्या माणसाची बायको त्यांना पकडायला जवळ येत होती.. आणि पुढून तो माणूस पुढे पुढे सरकत होता... ते विचारातच हरवले होते....
तोवर तो माणूस त्यांच्या जवळ जवळ येवू लागला.. त्याने मागे घेतलेला हात पुढे केला तर त्याच्या हातात एक चाकू दिसत होता तो हसत हसत जवळ येत म्हणाला पहिल्यांदा कोणाकडे जावू आज खूप हात शिवशिवालेत तुम्ही माझा चांगला चाललेला धंदा बंद पाडत आणलात आता आता तुमची खैर नाही मी तुम्हाला जावूच देणार नाही...
अस म्हणत तो त्यातल्या एका मुलावर चाकू चालवायला गेला तोच एक गोळी येवून त्याच्या हातातून आरपार गेली. तस त्याच्या हातातला चाकू पण धाडकन खाली पडला.... तो वेदनेने जोरात ओरडला...
त्याच्या मागे पोलिसांची एक टोळी उभी होती. ते पाहून तो माणूस प्रचंड तापला त्याने पोलिस पुढे येण्याआधीच झालेली वेदना विसरून त्यांच्यातल्या एका मुलाला पळत पुढे पुढे जावून गळ्याभोवती हाताच वेटोळे करत धमकी दिली.. जर तुम्ही माझ्या जवळ आलात तर या मुलाचा अंतच झाला... तो मुलगा तर प्रचंड घाबरला पहिल्यांदा त्याच्या बाबतीत अस घडत होत..
पोलिस सोड सोड त्याला अस म्हणतच होते....पण तरीही
तो त्याला तसच ओढत ओढत मागच्या दारातून दूर नेवू लागला. त्याने डोळ्यांनीच बायकोला पण एक कसला तरी इशारा केला तस ती थोड पुढे गेली आणि एका जागी ती ने पाय आदळला तस एक फरशी उचलली गेली ती ने सगळ्यांना काय कळायच्या आतच त्या चौघांना आत ढकलेले आणि स्वतः पण आत घुसली... हे पाहून ते पोलिस तिथे जावून फरशी उचलू लागले.... त्यांनी ती फरशी उचलली व ते सुद्धा आत घुसले...
त्या माणसाची बायको त्या मुलांना घेऊन बांधू लागली तिला ते पोलिस पण तिथे येत आहेत याचा अंदाज आला नाही कारण ती जास्त वेगात फरशी उचलून पुढे पुढे जात होती... ती एके ठिकाणी थांबली व त्या मुलांचे हात पाय बांधले व तशीच समोरच्या एका भिंतीसमोर जावून काही शब्द उच्चारून त्यातून बाहेर गेली....

इकडे तो माणूस त्या मुलाला घेऊन दूर दूर जावू लागला.. त्याला थोडी पण कल्पना नव्हती की त्याच्या मागून दबक्या आवाजात एक स्त्री येत होती. ती त्या माणसाची नजर चुकवत चुकवत पाठलाग करत होती...
एके ठिकाणी तो माणूस आला आणि त्याने एका झाडाला त्या मुलाला बांधले... आणि म्हणू लागला. थांब आता इथेच तस तुला मारणारच होतो पण तुम्हाला सगळ्यांना एकदम मारण्यातच लय मज्जा येईल. हा हा हा.... अस म्हणत म्हणत पुढे गेला... तो माणूस गेल्याबरोबर तिथे एक स्त्री आली ती ने या मुलाच्या हाताला बांधलेले दोर सोडले...
तो मुलगा म्हणू लागला आय आय तू तू इथे काय करतेस...
आर लेकरा काय हे काय झाले तुला कोण आहे तो माणूस... अस का पकडल तुम्हाला त्याने....
अग आई ते सांगतो मी पण आधी हे तर सांग तू कशी आलीस इथे
अरे ते मी पोलिसांना रोज विचारायला जायची पोलिस स्टेशनमध्ये तुझ्या बद्दल तेव्हा त्यांनी खूप तपास केला पण तुम्ही कोठे नाही सापडला..
आणि परवा तुझा मित्र पोलिस स्टेशनमध्ये आला आणि त्याने तुम्ही कोठे आहात तिथे काय काय घडले ते सगळ सांगितले....
ते ऐकून पोलिसांनी तिथे मला पण बोलवल आणि आम्ही तुमच्या मुलाला शोधून आणतो अस म्हणल पण मला राहवलेच नाही. मला पण घेऊन चला असच म्हणत राहिले... तेव्हा ते एका अटीवर तयार झालेले कि ते सांगे पर्यंत मी त्या ठिकाणी पोहोचल्यावर आमच्यासोबत यायच नाही... त्यांनी या लोकांना समजू नये म्हणून साधी गाडी आणली ... जीचा जास्त आवाज होत नाही अशी....
इथे आल्यानंतर मी बरीच वाट पाहिली पण त्यांनी आवाज नाही दिला म्हणून मी दरवाज्यातून हळूच बघू लागले. तर तुला तो माणूस दूर नेत होता... मागच्या दरवाज्यातून.... मी पुढून पाठलाग करत करत येते आले..... ती हे सगळ सांगत होती तोपर्यंत कोणतरी तिथे येत असल्याचा आवाज आला. ते ऐकून ती त्या मुलाची आई त्याला घेऊन दूर जाऊ लागली.....
ती दोघेही पळत पळत पुढे जावू लागली....
एके ठिकाणी ते पोहोचले तोच समोर तो माणूस आणि त्याचा एक साथीदार त्यांच्याकडे बघून हसू लागले... ते तसेच पुढे त्यांच्याकडे येवू लागले.. ते पाहून तो मुलगा आणि त्याची आई दुसरीकडून पळू लागले.... पण तोपर्यंत त्याची बायको पळत पळत तिथे आली आणि तिने त्या मुलाच्या आईला पकडल आणि त्या माणसाच्या साथीदाराने त्याच्या मुलाला पकडल आणि ओढत ओढत दूर नेवू लागला.... तो मुलगा मागे वळून वळून आईकडे बघू लागला.त्याची आई पण भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली.... साथीदाराने त्या मुलाला दूर नेल्यावर तो माणूस त्याच्या आईकडे पुढे सरसावला व प्रचंड वेगाने त्याच्या आईवर चाकू चालवला तोच तिथे पोलिस पोहोचले त्यांनी समोरचा प्रसंग पाहून त्या माणसाच्या हातात गोळी घातली.... तो परत जोरात ओरडला.... व बायकोकडे बघत खुणेनेच काही सूचना केल्या.....
ती तशीच धावत मुलांच्या कडे जावू लागली ती विसरूनच गेलेली कि आपल्याला ती फरशी उचलताना पोलिसांनी पाहिलेले आपण मुलांना त्या खोलीत ठेवून तसच आलो जर पोलिस तिकडे गेले तर त्यांची सुटका करतील.... हा विचार करत करत ती पुढे जातच होती कि काही पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांची क्रूरता लक्षात घेऊन गोळ्यांचा मारा केला... ती तशीच ढासळली कारण गोळ्या तिच्या छातीतून आरपार गेलेल्या..... ते पाहून तर तो माणूस प्रचंड ओरडला व तसच पोलिस जवळ येण्या आधीच त्याच्या आईला ज्या चाकूने मारल तो परत हातात घेऊन स्वतः च्याच पोटात घुसवला व विचित्र पद्धतीने हसू लागला... व त्या मुलांकडे पाहून जोरात ओरडला याचा बदला मी घेणारच हा हा हा....

तोपर्यंत काही पोलिस त्या चार मुलांना घेऊन तिथे आले... त्यांच्यातली एक मुलगी त्या स्त्रीकडे पाहून जोरात रडू लागली.... तिला बाकिचे मित्र तसच सावरू लागले... नंतर त्यांना त्याच्या एका मित्राची आठवण झाली... त्यांनी लगेच पोलिसांना सांगितले की आमचा एक मित्र येथे नाही आहे... ते पाहून पोलिस आणि बाकिचे मित्र त्याला शोधू लागले.... ते शोधत शोधत एका झाडाजवळ गेले तर त्यांना बेशुद्धावस्थेत त्यांचा मित्र सापडला.... त्याला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता दूर झाली....
त्याला शोधल्यानंतर काही पोलिस त्या मुलांना घेऊन तिथून बाहेर पडले... व काही त्या माणसाच्या आणि त्याच्या बायकोच्या मृत झालेल्या शरीरांकडे जावू लागले.... ते त्या ठिकाणी गेले पण त्यांना त्या माणसाच आणि त्याच्या बायकोचे मृत शरीर सापडलेच नाही... तरीही त्यांनी खूप शोध घेतला पण काही उपयोग नाही झाला..
नंतर त्यांनी शोध घेणच बंद केले कारण तसही ती सगळी मुल वाचलेली आणि ती दोघ मेलेली फक्त प्रेतच सापडेनात पण बाकिच्यांना काही त्रास नाही होणार आता म्हणून शोध घेणे बंद केल....