हिरवे नाते - 5 - तात्याकाका

  • 8.3k
  • 3.3k

    साधारण १९४६ चा काळ होता. पुण्याला वाड्यामध्ये बिऱ्हाड करून रहायची त्याकाळी मोठ्या प्रमाणावर सोय होती. नवीन लग्न झालेले, शिक्षणासाठी आलेले कुटुंब, मुलं गावी ठेवून बदलीवर आलेले असे बरेच लोकं वाड्यांमधून दोन खोल्या घेऊन रहात असायचे.     आम्ही पण असेच बाबांची बदली झाली त्या निमित्ताने पुण्याला आलो होतो. आम्हा मुलांना चांगल्या शाळेत घालता येईल म्हणून बाबांनी गुहागरहून सगळ्यांनाच इकडे आणले होते. त्यांच्या मित्राच्या ओळखीने वाड्यातल्या तीन खोल्या मिळाल्या होत्या. सामान सुमान घेऊन आम्ही त्या वाड्यावर आलो. परांजपे वाडा होता तो. तेव्हा पुणं एव्हढं गजबजलेलं नव्हतं. झाडांनी वेढलेल्या वाडयाचं दर्शन फार छान वाटलं. सगळ्या प्रकारच्या फळझाडांनी आणि फुलझाडांनी आवार बहरलं होतं.