हरि - पाठ १

  • 11.9k
  • 5.6k

श्री संत एकनाथ महाराजपाठ१हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥२हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें