Hari book and story is written by Sudhakar Katekar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Hari is also popular in आध्यात्मिक कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
हरि - कादंबरी
Sudhakar Katekar
द्वारा
मराठी आध्यात्मिक कथा
१
हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥
हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥
हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२
हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥
नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥
सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥
मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥
जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
श्री संत एकनाथ महाराजपाठ१हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥हरिरूप झालें जाणीव हरपले ...अजून वाचामीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥२हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें
“हरि पाठ” 2 १० स्वहिताकारणें संगती साधूची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥ हरि तेथें संत संत तेथें हरी । ऐसें वेद चारी बोलताती ॥२॥ ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥ वेदार्थाचा ...अजून वाचाकन्याभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥ वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥ ११ सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया । आनंदपदीं जया म्हणती हरी ॥१॥ सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥ तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥ हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ॥४॥ अस्ति भाति प्रिय ऐशीं
हरि पाठ ३ १० हाचि नेम सारीं साधेल तो हरी । नाम हें मुरारी अच्युताचें ॥१॥ राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे । यादव मोहरे रामनाम ॥२॥न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचे ॥३॥ नाम म्हणे ...अजून वाचाआम्हां हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां ॥४॥ ११ करूं हें कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें ॥१॥ जगाचा जनक रामकृष्ण एक । न करितां विवेक स्मरें राम ॥२॥ तुटेल भवजाळ कां करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥३॥ नामा म्हणे गोविंद स्मरें तूं सावध । नव्हे तुज बाधा नाना विघ्नें ॥४॥ १२ मायेचीं भूचरे रज
हरिपाठ ४ २६ नामाचेनि पाठे जातील वैकुंठें । तो पुंडलीक पेठे प्रकट असे ॥१॥ विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र । आणिक नाही शस्त्र नामाविण ॥२॥ पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गेले ॥३॥ नामा म्हणे हरी नामेंचि ...अजून वाचा। जन्माची येरझारी हरे नामें ॥४॥ २७ सर्वांभूतीं भजें नमन करीं संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥१॥ ऐसी भजनी विनट सांपडेल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ॥२॥ न लगतीं साधनें वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गेले ॥३॥ नामा म्हणे थोर नामचि साधार । वैकुंठीं बिढार तयां भक्ता ॥४॥ २८ तूं तव नेणता परि हरि तो जाणता ।
हरिपाठ५ ५ जपतां कुंटिणी उतरे विमान । नाम नारायण आलें मुखा ॥ १॥ नारायण नाम तारक तें आम्हां । नेणों पैं महिमा अन्य तत्त्वीं ॥ २॥ तरिले पतित नारायण नामें । उद्धरिले प्रेमें हरिभक्त ॥ ३॥ निवृत्ति उच्चार नारायण ...अजून वाचा। दिननिशी प्रेम हरी हरी ॥ ४॥ ६ एक तत्त्व हरि असे पैं सर्वत्र । ऐसें सर्वत्र शास्त्र बोलियलें ॥ १॥ हरिनामें उद्धरे हरिनामें उद्धरें । वेगीं हरि त्वरें उच्चारी जो ॥ २॥ जपता पैं नाम यमकाळ कांपे । हरी हरी सोपें जपिजे सुखें ॥ ३॥ निवृत्ति म्हणे हरिनामपाठ जपा । जन्मांतर खेपा अंतरती ॥ ४॥ ७ गगनींचा घन जातो