अभयारण्याची सहल - भाग २

  • 8.3k
  • 4.1k

भाग १ वरुन पुढे वाचा.... “अनोळखी माणसाला कार मध्ये घ्यायचं?” – नलिनी “हे बघ इतर वेळी मी थांबलो पण नसतो, पण रात्रीची वेळ आहे, घनदाट जंगला मधे हा माणूस रस्ता शोधत एकटा पायी फिरतो आहे, तू ऐकलसच की याला पण गेस्ट हाऊसलाच जायचं आहे. जंगलात प्राण्यांचा धोका संभवतो , काही वेडं वाकडं झालं तर आपण स्वत:लाच माफ नाही करू शकणार, बरं चांगला सभ्य दिसतो आहे. काय म्हणतेस?” शशांक म्हणाला. “तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पटतेय मला. आणि मग मागच्या सीट वर बसलेल्या आपल्या नणदे वळून म्हणाली, शलाका, तुझं काय मत आहे?” – नलिनी. “घे दादा त्यांना. आपल्याला पण सोबत होईल. वहिनी तू ये मागच्या सीट वर.” – शलाका म्हणाली.