अभयारण्याची सहल - भाग ५

  • 6.9k
  • 3.4k

अभयारण्याची सहल भाग ५   भाग ४  वरुन पुढे वाचा.... संदीप ला शुद्ध आलेली बघून त्यांना आनंद झाला. त्याच्याशी किती बोलू आणि किती नाही असं आईला झालं, पण बाबांनी समजावलं. गेले पांच दिवस सगळेच टेंशन मध्ये होते. पण आता ते दूर झालं होतं. “काय ग आई, ही मुलगी इथे का थांबतेय?” – संदीप. “अरे तू जिवाची पर्वा न करता तिला वाचवलं ना म्हणून येतेय तुझी काळजी घ्यायला.” – संदीपची आई.  “अग पण आपली ओळख नाही, पाळख नाही, अशी कशी येतेय? तिच्या घरचे सुद्धा काही म्हणत नाहीत? अग ती काल रात्री पण इथेच होती.” – संदीप.  “चांगली आहे मुलगी.” आई संदीपला