हरि - पाठ ४

  • 4.2k
  • 1.4k

हरिपाठ ४ २६ नामाचेनि पाठे जातील वैकुंठें । तो पुंडलीक पेठे प्रकट असे ॥१॥ विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र । आणिक नाही शस्त्र नामाविण ॥२॥ पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गेले ॥३॥ नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी । जन्माची येरझारी हरे नामें ॥४॥ २७ सर्वांभूतीं भजें नमन करीं संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥१॥ ऐसी भजनी विनट सांपडेल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ॥२॥ न लगतीं साधनें वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गेले ॥३॥ नामा म्हणे थोर नामचि साधार । वैकुंठीं बिढार तयां भक्‍ता ॥४॥ २८ तूं तव नेणता परि हरि तो जाणता ।