अभयारण्याची सहल - भाग ६

  • 5.9k
  • 3.1k

अभयाराण्याची सहल भाग ६ भाग ५  वरुन पुढे वाचा....   “आपली कुठलीही ओळख नसतांना तुम्ही माझ्या साठी जिवाची बाजी लावलीत ते कुठल्या हक्कानी?” शालाकाचा बिनतोड सवाल. “हक्क कसला, ते कर्तव्यच होतं माझं आणि हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे.” – संदीपने सफाई दिली.   “तुम्ही आणखीही म्हणाला होता की जवान लढतात ते कर्तव्य म्हणून बरोबर?” – शलाका. “हो.” संदीप.   “कर्तव्य का असतं? कारण त्यांचा देशावर हक्क असतो म्हणून. मग याच न्यायाने मी कर्तव्य करते आहे ते माझा तुमच्या वर हक्क आहे म्हणूनच. कळलं का?” – शलाकाने आपला मुद्दा मांडला. “यावर मी काय बोलणार आता?” – संदीप. “नकाचं बोलू. शांत