अभयाराण्याची सहल भाग ७ भाग ६ वरुन पुढे वाचा.... “थांब, थांब, हे बघ आत्ता, तुझ्या मनात कृतज्ञतेची भावना प्रबळ आहे. पण वर्षभरातच ती ओसरून जाईल आणि हे सगळं खटकायला लागेल. तू खूप सुंदर आहेस, आणि माझ्या अंगावर, चेहऱ्यावर या जखमांचे व्रण, आणि त्यामुळे कुरूप झालेला चेहरा, चार लोकं जेंव्हा बोलायला लागतील, तेंव्हा तुला तुझी चूक कळून येईल. पण तेंव्हा फार उशीर झाला असेल. म्हणून म्हणतो. आताच सावध पणे पावलं उचल. नको या भानगडीत पडू. मी पुन्हा पूर्ववत होणं शक्य नाही.” संदीप काकुळतीने म्हणाला. “तुमचं बोलून झालं का?” – शलाका. “हो. आणि माझी विनंती आहे की आजची आपली ही