हरिपाठ५ ५ जपतां कुंटिणी उतरे विमान । नाम नारायण आलें मुखा ॥ १॥ नारायण नाम तारक तें आम्हां । नेणों पैं महिमा अन्य तत्त्वीं ॥ २॥ तरिले पतित नारायण नामें । उद्धरिले प्रेमें हरिभक्त ॥ ३॥ निवृत्ति उच्चार नारायण नाम । दिननिशी प्रेम हरी हरी ॥ ४॥ ६ एक तत्त्व हरि असे पैं सर्वत्र । ऐसें सर्वत्र शास्त्र बोलियलें ॥ १॥ हरिनामें उद्धरे हरिनामें उद्धरें । वेगीं हरि त्वरें उच्चारी जो ॥ २॥ जपता पैं नाम यमकाळ कांपे । हरी हरी सोपें जपिजे सुखें ॥ ३॥ निवृत्ति म्हणे हरिनामपाठ जपा । जन्मांतर खेपा अंतरती ॥ ४॥ ७ गगनींचा घन जातो